Unseasonal Rainfall Impact: इंदापूर तालुक्याीतल पळसदेव परिसराला नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा फटका बसला. जोराच्या वाऱ्यामुळे शेतातील आंब्यांच्या कैऱ्या गळून पडल्या, तर डाळिंब, पेरू, केळी पिकांचे नुकसान झाले आहे..शेतातील कांदा, कडवळ, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पत्र्याचे छत व सौर ऊर्जेचे पॅनेल वाऱ्याने उडून गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली आहे..Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव.सायंकाळी अचानक आलेल्या या वादळामुळे शेतकऱ्यांची कांदा, डाळिंब, पेरू आणि आंबा यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळामुळे झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या होत्या..Heavy Rainfall Loss: अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत.दरम्यान, शनिवारी (ता. २५) दिवसभर तारा ओढण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून सुरू होते. पावसाच्या फटक्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शासनाने भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे..उभी पिके जमीनदोस्तफळबागांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असून, कडवळ आणि मक्याची उभी पिके जमीनदोस्त झाली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, काही घरांवरील पत्र्याची छते उडून गेली, तर काही ठिकाणी सौर पॅनेलही उखडून फेकले गेले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.