Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील आठही नगरपालिकांसाठी मंगळवारी (ता. दोन) सरासरी ६८.९७ मतदान झाले. एकूण दोन लाख ४३ हजार ६७२ मतदारांपैकी एक लाख ६८ हजार ५६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता उमेदवार व कार्यकर्त्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. आठपैकी सात पालिकांमध्ये काही प्रमाणात वाढलेला मताचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता आहे..धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम, उमरगा, कळंब, भूम व परंडा या आठ नगरपालिकांसाठी मंगळवारी (ता. २) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. धाराशिवमधील २० प्रभागांतील १०८ केंद्रांवर मतदान झाले. ९४ हजार सहा मतदारांपैकी ५७ हजार ४७८ जणांनी मतदान केले. सरासरी ६१.१४ टक्के मतदान झाले. .Local Body Elections: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर करा ; सुप्रीम कोर्ट.तुळजापूरमध्ये २९ हजार ५६१ मतदारांपैकी २३ हजार ७३३ जणांनी मतदान केले. सरासरी ८०.२८ टक्के मतदान झाले. नळदुर्गमध्ये १७ हजार १२२ मतदारांपैकी १२ हजार ५२९ जणांनी मतदान केले. सरासरी ७३.१७ टक्के मतदान झाले. उमरगामध्ये ३१ हजार ७९१ मतदारांपैकी २१ हजार २३९ जणांनी मतदान केले. सरासरी ६६.८१ टक्के मतदान झाले. मुरूममध्ये १४ हजार ९२० मतदारांपैकी १० हजार ५७ जणांनी मतदान केले. .Local Boyd Elections: खुलताबाद नगरपरिषदेत १४ हजार ७७५ मतदार.सरासरी ६७.४१ टक्के मतदान झाले. कळंबमध्ये २० हजार ९५८ मतदारांपैकी १५ हजार २३४ जणांनी मतदान केले. सरासरी ७२.६९ टक्के मतदान झाले. भूममध्ये १८ हजार ७७ मतदारांपैकी १४ हजार ३१८ जणांनी मतदान केले. सरासरी ७९.२१ टक्के मतदान झाले. परंडामध्ये १७ हजार २३२ मतदारांपैकी १३ हजार ४६८ जणांनी मतदान केले. सरासरी ७८.१३ टक्के मतदान झाले..आठही पालिकांतील एक लाख २४ हजार १८९ पुरुषांपैकी ८७ हजार ७३८ पुरुष मतदारांनी व एक लाख १९ हजार ४५२ महिलांपैकी ८० हजार ३०२ महिला मतदारांनी व अन्य १६ अशा एकूण एक लाख ६८ हजार ५६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.मागील निवडणुकीच्या तुलनेत तुळजापुरात मतदानाचा टक्का घसरला आहे. उर्वरित सातही पालिकांमध्ये काही प्रमाणात मतदानामध्ये वाढ झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.