Mrig Bahar Keli Lagwad: खानदेशात अलीकडच्या काळात बारमाही केळी लागवडीचे प्रमाण वाढत असून यंदा लागवडीसाठी दर्जेदार कंदांना मोठी मागणी आहे. केळीचे दर काही काळ कमी राहिल्याने, तसेच कांदेबाग केळी हंगामात अनेक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागल्याने उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांऐवजी कंदांचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे..सध्या आगाप मृग बहर हंगामातील केळी लागवड सुरू आहे. अनेक शेतकरी केळी कंद लागवडीकडे वळले आहेत. यंदा लागवड क्षेत्र स्थिर राहण्याचा अंदाज असल्याने कंदांचा मोठा तुटवडा नाही. मात्र रोपांचा पुरवठा कमी असल्याने कंदांची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे. मागील महिन्यापासूनच केळी कंदांना चांगली मागणी आहे..Banana Cultivation: उष्णतेमुळे केळी लागवड रखडली.अनेक कंपन्यांकडून रोपांचा पुरवठा केला जात असला तरी त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांना सध्या केळी कंद तीन ते चार रुपये प्रतिकंद या दराने उपलब्ध होत आहेत. उष्णतेमुळे रोपांची वाढ समाधानकारक होत नसल्याने शेतकरी कंद लागवडीला प्राधान्य देत आहेत..खानदेशात जून महिन्यातही कंदांची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. सध्या सर्वत्र केळी लागवड सुरू नसल्याने कंदांचे दर स्थिर आहेत. खोडवा आणि जुनारी केळी बागांमधील कंद अपेक्षेप्रमाणे अंकुरत नसल्याने त्या भागातील मागणी कमी आहे. अनेक शेतकरी ६० ते ७० टक्के काढणी पूर्ण झालेल्या बागांमधून कंद काढून घेत आहेत. त्यानंतर बागाखालील क्षेत्र रिकामे करून खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली जात आहे..Banana Price: खानदेशात केळी दर स्थिर.कंद विक्रीसाठी शेतकरी एजंटांची मदत घेत असून समाजमाध्यमांद्वारे जाहिरातीही केल्या जात आहेत. सातमासी, आंबेमोहोर, श्रीमंती, वसई आणि महालक्ष्मी या वाणांसाठी शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव परिसरात जात आहेत..उष्णतेमुळे कंद जपण्यावर भरसध्या तापमान अधिक असल्याने शेतकरी कंद शेतात आणल्यानंतर सावलीत झाकून ठेवत आहेत. ढगाळ किंवा पावसाळी वातावरण निर्माण झाल्यानंतर लागवड करण्याचे नियोजन केले जात आहे. कंद १५ ते २० दिवस दाट सावलीत ठेवून त्यावर नियमित पाण्याचा शिडकावा केल्यास उगवण क्षमता टिकून राहते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.