Nashik News : जमिनीचे एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. म्हणूनच कांदा पिकात ही ते महत्त्वाचे आहे. जमीन आरोग्य व सुपीकता टिकवण्यासाठी माती व पाणी परीक्षण या तंत्राचा प्रभावीपणे वापर करावा, असा सल्ला मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्र विषय विशेषज्ज्ञ विजय शिंदे यांनी दिला..पाटणे (ता. मालेगाव) येथे ‘सकाळ-ॲग्रोवन’ आणि रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात दर्जेदार कांदा, डाळिंब उत्पादन तंत्र व पाणी व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्री. शिंदे यांनी उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले..Soil Fertility: जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी उपाययोजना.या प्रसंगी सौंदाणे येथील उपकृषी अधिकारी सचिन भगत, सहायक कृषी अधिकारी(पाटणे), महेश गरुड, सहायक कृषी अधिकारी(सौंदाणे), मच्छिंद्र साळुंखे, रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. स्टेट मॅनेजर विजय घुगे, रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लिचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, रिवुलिसचे तांत्रिक अधिकारी सतीश आकडे, कृषी अभियंता अभिषेक पगार, सरपंच संजय जशोद यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..श्री. शिंदे म्हणाले, की कांदा पिकासाठी सुपीक चांगली निचरा होणारी, मध्यम जमिनीची निवड करावी. कांदा रोप निर्मिती गादी वाफ्यावर करावी. बीजप्रक्रिया आवश्यक आहे. बियाण्यास २ ते ३ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. जैविक पद्धतीमध्ये ट्रायकोडर्मा पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्यात वापर करावा. दर्जेदार रोपांच्या लागवडी झाल्यानंतर माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी, असे त्यांनी नमूद केले..Soil Fertility: जमीन सुपीकतेवर द्या लक्ष.श्री. लोणाळे यांनी रिवुलिस कंपनी उत्पादनाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रम आयोजनासाठी भूषण ॲग्रो एजन्सीचे भूषण धनवट व कैलास धनवट यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन’चे प्रतिनिधी सुनील रौंदळ यांनी केले. सरपंच जशोद यांनी आभार मानले. या चर्चासत्रासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..डाळिंबासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेडाळिंब पिकामध्ये मुळांच्या क्षेत्रात सतत वाफसा टिकून राहावा यासाठी डबल-लाइन इनलाईन ड्रिपलाइन वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे पाणी व खतांचे एकसमान वितरण होते, झाडांची वाढ संतुलित राहते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते. ठिबकच्या साहाय्याने पाण्याची बचत, खतांचा कार्यक्षम वापर आणि उत्पादन खर्चात घट साधता येते. तंत्रज्ञानाधारित व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाणी व्यवस्थापन हेच डाळिंब पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे, असे श्री. लोणाळे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.