Bhima River Pollution: शिरापूरला भीमा नदीतील जलपर्णीत वाढ
Water Hyacinth Issue: शिरापूर (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उजनी धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यावर जलपर्णीची झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये नदीकाठच्या गावांकडून सांडपाण्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता सांडपाणी ओढ्यात सोडून दिले जाते.