Nanded News: नांदेड जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांत जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. तर सप्टेंबरमधील दहा तारखेपर्यंत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात मागील १२ वर्षांच्या काळात एकूण १६५६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात आत्महत्येच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. .नांदेडमध्ये मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात २०१४ पासून वाढ झाली. सततचा ओला किंवा कोरडा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. जिल्ह्यात सतत चार वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, यामुळे हातची पिके मातीमोल होत असल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही..Farmers Issue : शेतकऱ्यांचा आवाज एकसंध राहिला तरच त्याला न्याय मिळेल.या कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याची कारणे पुढे आली आहेत. मागील चार वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप गेला. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन या आपत्तीत मृत्युमुखी पडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास पुरामुळे गेल्याने शेतकरी हताश झाले. यातूनच गेल्या दोन महिन्यांत तब्बल तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या वर्षातील आठ महिन्यांत जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे..Jalna Farmers : बदनापूर, परतूरसाठी नावीन्यपूर्ण प्रस्ताव सादर करा .आतापर्यंतची आकडेवारी२०१४ ११८२०१५ १९०२०१६ १८०२०१७ १५३२०१८ ९८२०१९ १२२.२०२० ७७२०२१ ११९२०२२ १४७२०२३ १७५२०२४ १६७ऑगस्ट २०२५ पर्यंत ११०१० सप्टेंबरपर्यंत सहा अशा एकूण ११६ घटना घडल्या.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.