Chief Minister scheme : (विक्रम पाठक) भंडीशेगाव (संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरून) : पंढरपूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावरील भंडीशेगाव येथे उभारलेल्या मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातच वारकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे चित्र गुरुवारी (ता. २३) दिसून आले..पालखी मार्गावर मोठा गाजावाजा करत उभारलेल्या या सुविधा केंद्रात विश्रांती कक्ष, वाहनतळ, स्वयंपाकासाठी जागा, महिलांसाठी स्नानगृहे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, रिमझिम पावसामुळे केंद्र परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाढलेल्या वारकरी संख्येमुळे व्यवस्थेवर ताण आल्याचे दिसून आले..Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला न्यायालयाची अंतरिम स्थगिती.स्नानगृहाकडे जाण्यासाठी चिखलातूनच वाट भंडीशेगाव येथे महिलांसाठी ४० ते ५० स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली असली तरी तेथे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे महिलांना चिखल तुडवतच स्नानगृहापर्यंत जावे लागत असून, त्यातून गैरसोय होत आहे..विश्रांती कक्षातही कचरामुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात वारकऱ्यांसाठी मोठा विश्रांती कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, या विश्रांती कक्षात कचरा पसरला असून वारकरी नाइलाजाने कचरा अन् पाण्याच्या बाटल्या बाजूला सरकवून आपले काही अंथरूण असेल तर ते टाकून काही वेळ विश्रांती घेत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.