Agrowon Diwali Article: वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
Livestock Heritage: सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं सातेवाडी-त्रिशूळवाडी हे अकोल्यातील एक दुर्गम पण जिवंत गाव आहे. इथं बाळासाहेब मुठे कुटुंबाने कैक पिढ्यांपासून डांगी गोवंश पालनाचा वारसा जपला आहे. त्यांचं जीवन म्हणजे माती, निसर्ग आणि परंपरेशी असलेलं नातं जपण्याचं उदाहरण आहे.