Mumbai News: ‘‘दुबार, तिबार मतदार जिथे दिसेल तेथे फटकवा, कायद्याचा बडगा आम्हाला दाखवाल तर आम्ही त्या बडग्याचे काय करायचे ते ठरविले आहे. आम्ही न्यायालयात दुबार मतदारांविरोधात दाद मागूच पण रस्त्यावरची लढाईही खेळू,’’ असा इशारा सर्वपक्षीय सत्याचा मोर्चात शनिवारी (ता. १) देण्यात आला..याप्रसंगी राजकीय मतभेद असले तरी संसदीय लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी केले. फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिका चौकादरम्यान काढलेल्या या मोर्चात सत्ताधारी पक्ष वगळता शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्ष, मनसे, भाकप, माकप, शेकाप, यांसह लहान-मोठे सर्व पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते..Indian Politics: मौनं सर्वार्थ साधनम् !.याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान देत ‘अनाकोंडा’ला आता कोंडण्याची वेळ आली आहे, असे आव्हान दिले. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुबार, तिबार मतदारांना जेथे दिसतील तेथे फटकवा आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात द्या, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले..राज ठाकरे म्हणाले, की मतदार याद्या दुरुस्त करण्यात हरकत काय आहे? आम्ही वारंवार सांगूनही ऐकले जात नसेल तर समजून सांगण्यासाठी हा मोर्चा आहे. आता निवडणुकीत प्रत्येक घरात जाऊन मतदार याद्या तपासा, यादीतील चेहरे समजले पाहिजेत. एवढे करूनही जर दुबार मतदार आले तर आधी फटकवायचे, बडव-बडव बडवायचे आणि मग पोलिसांकडे द्यायचे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला..उद्धव ठाकरे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना कसा फायदा झाला याचा पर्दाफाश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. त्यांचे आव्हान आम्हाला मान्य आहे. जयंत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत आहे. या मतचोरीविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. .Maharashtra Politics: सत्तेसाठी वापर साऱ्या आयुधांचा!.‘मोर्चात निवडणूक आयोगही आहे का?’‘‘आज भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. यात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे का,’’ असा खोचक सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारून भाजप आणि निवडणूक आयोगाला चिमटा काढला..दुबार मतदारांचा गठ्ठाराज ठाकरे यांनी सभास्थळी दुबार मतदार याद्यांचा मोठा गठ्ठा आणला होता. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी येथील चार हजार मतदारांनी मलबार हिल परिसरात मतदार केल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात ६२ हजार ३७०, दक्षिण मुंबईत ५५ हजार, मावळमध्ये एक लाख ४५ हजार ६३६, पुण्यात १ लाख २ हजार, ठाण्यात २ लाख ९ हजर दुबार मतदार आहेत, इतके दुबार मतदार असताना निवडणुका कशा काय घेता?’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.