Jalgaon News: भडगावसह जवळच्या टोणगाव शेत शिवारात शेतकऱ्यांनी शेतांमध्ये जीवाचे रान करून राबराब राबून पिके घेतली आहेत. मात्र, पाच-सहा वर्षांपासून शहरातील काही नागरिकांनी त्यांच्या मालकीची सोडून दिलेली मोकाट जनावरे पीक पायदळी तुडवून उद्ध्वस्त करीत आहेत. कष्टाने उत्पादित केलेले पीक मोकाट जनावरांच्या घशात जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १५) मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी करीत येथील तहसीलदार शीतल सोलट यांना निवेदन दिले. निवेदनाची दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा या वेळी देण्यात आला..भडगाव शहराच्या हद्दीसह टोणगाव, कराब शिवारात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यावरच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची गुजराण होते. शहरातील काही पशुपालकांकडे त्यांच्या मालकीच्या गायी, बैल, म्हशी यासारखे पशुधन आहे. मात्र, त्यापैकी काही जनावरे बांधून न ठेवता मोकाट सोडलेली असतात. सद्यःस्थितीत तब्बल २५० ते ३०० मोकाट जनावरे शेत शिवारात वावरताना दिसतात. ही जनावरे अनेकदा कळपाने येऊन एकाच रात्रीत शेतातील पिकांची नासधूस करतात. शहरातील मुख्य रस्त्यासह इतरही अनेक भागांत मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे..Wildlife Crop Damage: शेतात वन्यप्राण्यांचा उच्छाद, पिकांचे नुकसान.शेतकऱ्यांनी दिवसभर शेतात काम करून पिकांची काळजी घेतलेली असते. दुसऱ्या दिवशी पिकांचे मोकाट जनावरांनी नुकसान केलेले असते. या संदर्भात शहरातील काही जनावरांच्या मालकांना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून सांगितल्यानंतर जनावरांचे मालक उलट अरेरावीची भाषा वापरतात. काहींनी तर दादागिरी करून ‘तुमच्याने जे होईल ते करून घ्या’ अशा शब्दांत उत्तर दिल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार शीतल सोलट यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती कथन करून न्यायाची मागणी केली..Crop Damage : फळपिकांच्या नुकसान मदतीसाठी स्वतंत्र योजना नाही; केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण.उपोषणाचा इशारापिकांचे नुकसान करणाऱ्या जनावरांच्या मालकांना बोलावून त्यांच्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची ताकीद द्यावी व आमच्या पिकांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली. आठ दिवसांत मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास, भडगावसह टोणगाव, कराब शिवारातील रहिवासी येथील तहसील कार्यालयात बेमुदत उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनात दिला. .निवेदनाची प्रत पोलिस निरीक्षकांसह पालिकेचे मुख्याधिकारी, यशवंत सहकारी पीक सरंक्षण संस्था, उपविभागीय अधिकारी पाचोरा, बजरंग दल शाखा आदींना दिल्या. निवेदनावर रमेश शिरसाठ, सुरेश पाटील, संतोष महाजन, प्रल्हाद पाटील, भिकनूर पठाण, दिलीप सहस्रबुद्धे, आधार पाटील, संतोष महाजन, रामचंद्र भोई आदींच्या सह्या आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.