डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. शशिशेखर खडतरेMaharashtra Agriculture: कोरडवाहू पीक म्हणून रब्बी ज्वारी ओळखली जाते. मात्र मागील काही वर्षांत राज्यांत या पिकाखालील क्षेत्रात घट होत चालली आहे. यामागे वाढता मजुरी खर्च आणि पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण ही दोन मुख्य कारणे आहेत. याशिवाय मागील काही वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या परतीच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. ज्वारीचा वापर प्रामुख्याने धान्य व जनावरांसाठी कडबा म्हणून केला जातो. राज्यात कृषी पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारत असून त्यात हुरडा पार्टीचे प्रस्थ वाढत चालले आहे. .त्यामुळे हुरड्याला राज्यात आणि राज्याबाहेर मोठ्या मागणी आहे. साधारणपणे मकर संक्रांतीपासून हुरडा निघण्यास सुरुवात होते. राज्यात हुरड्याचा हंगाम साधारण ४५ ते ६० दिवस चालतो. चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिरव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. त्यासाठी दर्जेदार हुरडा उत्पादनासाठी सुधारित जातींची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. खास हुरड्यासाठी गोडसर रसाळ आणि भरपूर दाणे असणारे विविध वाण राज्यातील कृषी विद्यापीठांनी विकसित केले आहेत. रब्बी ज्वारी पेरणीसाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या वेळीची शिफारस करण्यात आली आहे..हुरडा आरोग्यदायी महत्त्वहिरव्या दाण्याचा हुरडा अतिशय स्वादिष्ट लागतो. हिरव्या दाण्याचा हुरड्याच्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, शर्करा, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. हुरडा लोह, झिंक, कॅल्शिअम, फॉस्फरस यांनी समृद्ध असतो. असे दाणे गोवऱ्यांच्या आचेवर भाजले असता दाण्यास स्वादिष्ट चव प्राप्त होते. लिंबू, मीठ, साखर, तिखट मसाला यासारखे पदार्थ वापरून त्यांची चव द्विगुणित करता येते..Rabi Jowar Cultivation: उत्पादनवाढ मिळविण्यासाठी रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान.हुरड्यासाठी सुधारित वाणःअ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केलेले वाण :१) फुले मधुर (आरएसएसजीव्ही -४६)प्रसारण वर्ष २०१४उत्कृष्ट प्रतिचा व चवदार हुरडाया वाणाचे खोड मध्यम, गोड, रसरशीतहा वाण उंच व पालेदार वाढतो.हुरडा अवस्था येण्यास ९३ ते ९८ दिवस लागतात.हुरडा अवस्थेत दाणे सहज सुटण्याचे प्रमाण हे ९५ टक्के पेक्षा जास्त.खोडमाशी किडीस प्रतिकारक.अवर्षणास प्रतिकारक.हुरड्याचे उत्पादन : हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलकडब्याचे उत्पादन : हेक्टरी ६५ ते ७० क्विंटल.२) फुले उत्तरा :प्रसारण वर्ष २००५स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसितहुरड्याची अवस्था येण्यास ९० ते १०० दिवस लागतात.भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात.सरासरी ७०-९० ग्रॅम इतका हुरडा मिळतो.हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.कणीस गोलाकार, मध्यम घट्ट.मध्यम उंचीचा असून पाने पालेदार असतात.खोड मध्यम, गोड रसरशीत.खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.हुरडा उत्पादन : हेक्टरी २० ते २५ क्विंटलकडब्याचे उत्पादन : हेक्टरी ५५ते ६० क्विंटल.ब) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित वाण ः१) एसजीएस ८-४हुरडा रुचकर आणि गोडहुरड्याची प्रत उत्तमकणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात.इतर हुरड्याच्या वाणापेक्षा याचा दाणा टपोरा.हुरडा उत्पादन : हेक्टरी १५ ते १६ क्विंटलकडब्याचे उत्पादन : हेक्टरी ७० ते ७५ क्विंटल.Rabi Jowar Variety : रब्बी ज्वारी लागवडीसाठी वाण.२) परभणी वसंत (पीव्हीआरएसजी १०१)प्रसारण वर्ष २०२१खाण्यास चवदार, गोड, मऊ.कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात.हुरड्याची अवस्था येण्यास ९५ दिवस लागतात.खोडमाशी, खोडकीड व खडखड्या रोगास सहनशील.दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तमहुरडा उत्पादन : हेक्टरी ३४ क्विंटलकडब्याचे उत्पादन : हेक्टरी १३३ ते १३५ क्विंटलमराठवाडा विभागासाठी शिफारस.क) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला१) ट्रॉम्बे अकोला सुरुची (टीएकेपीएस -५)प्रसारण वर्ष २०२२मळणीला अतिशय सुलभ- हुरड्याची प्रत उत्तम, चवदार- हुरडा तयार होण्याचा कालावधी ९१ दिवस- हुरड्याचे उत्पादन : हेक्टरी ४३ क्विंटल- हिरवा चारा उत्पादन : हेक्टरी ११० क्विंटल- महाराष्ट्रासाठी प्रसारित.ड) खरीप हंगामातील हुरडा वाण :१) पी.डी.के.व्ही कार्तिकी (वाणी १०३)- हुरडा चवदार आणि गोड- हुरडा ८२ ते ८४ दिवसांत तयार- मिझ माशीच्या प्रादुर्भावाला बळी पडत नाही.- हुरडा उत्पादन : हेक्टरी ४२ ते ४३ क्विंटल- विदर्भासाठी प्रसारित.२) पी.के. व्ही. अश्विनी (वाणी ११/६)- हुरडा ८२ ते ८४ दिवसांत तयार- हुरडा मळणीस सुलभ- हुरडा अधिक गोड व चवदार- दाण्यात साखरेचे प्रमाण अधिक- मिझ माशीस प्रतिकारक- हुरडा उत्पादन : हेक्टरी क्विंटल ४२ ते ४३इ) स्थानिक वाण :सुरती, गूळभेंडी, कुची कुची, काळी दगडी, वाणी, मालदांडी.- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९(कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.