राजेंद्र कदम, मुकुंद पाटीलOrganic Farming: जमिनीची सुपीकता ही प्रामुख्याने त्यात असलेल्या सेंद्रिय पदार्थांवर आणि या उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संख्येवर अवलंबून असते. कारण हेच घटक पिकांना अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेमध्ये मोलाची मदत करत असतात. या लेखामध्ये आपण मायकोरायझा या उपयुक्त बुरशीची माहिती घेऊ..पिकाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकरी सेंद्रिय,जैविक आणि रासायनिक निविष्ठांचा वापरकरत असतो. त्यातही रासायनिक घटकांचा वापर सर्वाधिक केला जातो. मात्र या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी निसर्गातील काही जिवाणू आणि बुरशी सातत्याने कार्य करत असतो. उदा. ॲझेटोबॅक्टर, रायझोबिअम, स्फुरद किंवा पालाश विरघळविणारे जिवाणू. या मालिकेमध्ये कार्य करणारी एक महत्त्वाची बुरशी आहे, तिचे नाव मायकोरायझा..Organic Farming Success : प्रतिकूलतेतही नगदी पिकांचे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन.मायकोरायझी ही वनस्पतींच्या मुळावर वाढणारी उपयुक्त बुरशी आहे. ही बुरशी यजमान वनस्पतीच्या मूळ प्रणालीमध्ये वसाहत करते. मायकोरायझी बुरशी व वनस्पती हे सहजीवनाचे उत्तम उदाहरण आहे. वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे सेंद्रिय रेणू बनवून ते बुरशीला साखर किंवा लिपिडच्या स्वरूपात पुरवते, तर बुरशी वनस्पतीला मातीतून घेतलेले पाणी आणि फॉस्फरससारखे खनिज पोषक तत्त्वे पुरवते. वनस्पतीच्या मुळांवर डोळ्यांना स्पष्ट दिसणारी मोठ्या आकाराची ही बुरशी स्पष्ट दिसते..ती वनस्पतीच्या मुळांची जमिनीतील पाणी आणि खनिजच्या शोषणाची क्षमता वाढवते. मायकोरायझी हे नैसर्गिक तंत्रज्ञानावर आधारित जैविक खताची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांचा वापर केल्यास ही बुरशी पिकांच्या मुळांशी तंतूमय संबंध निर्माण करून मुळांची पोषणशक्ती वाढवते. पिकाच्या मुळांवर वाढताना ही बुरशी एक प्रकारे मुळांचा विस्तारही वाढवत असते. परिणामी जमिनीत उपलब्ध आवश्यक खनिजांचे (उदा. फॉस्फरस, नायट्रोजन, पोटॅशिअम) उत्तम शोषण होते. पिकांची वाढ चांगली होते..पिकांच्या मुळांवर वाढणाऱ्या या वर्गातील बुरशींना व्हॅस्क्युलर अर्ब्युस्कुलर मायकोरायझा (व्हॅम) असेही म्हणतात. ड्रेस्डेन (जर्मनी) येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ अल्बर्ट बर्नहार्ड फ्रँक (१७ जानेवारी १८३९ - २७ सप्टेंबर १९००) यांनी हे नाव दिले आहे..Use of Fungi: रोग, कीड नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी.मायकोरायझीचा वापररोपवाटिकेमध्ये मायकोरायझी बुरशीच्या वापराचे काही प्रयोग करण्यात आले आहेत. त्यात वेगवेगळ्या जातींच्या मिरची रोपांवर केलेल्या वापराचे चांगले परिणाम दिसून आले. मायकोरायझाचा वापरामुळे मिरचीच्या रोपांची उंची, पानांची संख्या, फळांची संख्या, फळ उत्पादन लक्षणीयरीत्या वाढले. पुढे शेतामध्ये ही पिके भुईमूग आणि शेलोट (फ्रेंच कांदा) यासह आंतरपीक म्हणून घेण्यात आले. त्या पिकांनाही याचा चांगला परिणाम दिसला..वापरण्याची पद्धत व वेळरान बांधणीचे वेळी, बेड तयार करताना, बीज प्रक्रियेत किंवा पिकांच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत या बुरशीचा वापर करता येतो. याची आळवणी करणे किंवा ठिबकद्वारे देणेही शक्य असते. मात्र त्याचा वापर अन्य कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकांसोबत करता येत नाही..मायकोरायझाचे फायदेमायकोरायझी ही बुरशी झाडे आणि जमीन या दोन्हीसाठी फायदेशीर ठरते. या बुरशीच्या वापरामुळे पिकांच्या अन्नशोषणाऱ्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते. जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. त्यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर पडल्यास येणारा ताण यामुळे कमी राहतो. पिकांच्या उत्पादनामध्ये दहा ते वीस टक्के पर्यंत वाढ होते. मातीच्या कणांची संरचना सुधारते. माती भुसभुशीत होते. कंदकुज, मूळकुज यासाठी कारणीभूत बुरशींच्या प्रादुर्भावाला बऱ्यापैकी अटकाव करण्याचे काम ही बुरशी करते.राजेंद्र कदम, ९७६३४५८२७६मुकुंद पाटील, ९८६९०६९१८९(लेखक खासगी खत निर्मात्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.