Nashik News: केंद्र सरकारने देशात आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील ११ टक्के आयात शुल्क माफ केले असून सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंतच देण्यात आलेली ही सवलत कापड उद्योजकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने भारतीय उत्पादनावर ५० टक्के कर लादल्यामुळे भारतीय उद्योग व्यवसायावर मोठे संकट निर्माण झाले आहे. .देशातील कृषी उत्पादनांवर भरमसाट निर्यातशुल्क आकारून निर्यातीत अडथळे निर्माण करणारे सरकार परकीय देशातून आयात होणाऱ्या शेतीमालावरील आयात शुल्क माफ करण्याची विसंगत भूमिका घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नांदगाव तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी आहे. .Maharashtra Farmer Protest: शेतमजूर, शेतकरीप्रश्नी मुंबईत २८ ऑक्टोबरला धडक : कडू.केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणांचा फटका उद्योग क्षेत्राला बसणार आहे तर नियोजनातील धरसोड वृत्तीमुळे शेती उद्योग अडचणीत आहे. ब्राझील, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश या देशांतील कापूस याच कालावधीत विक्रीसाठी उपलब्ध असल्याने देशांतर्गत बाजारात मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. .शेतकरी ऑक्टोबरपासून स्थानिक बाजारात कापूस विक्रीस आणत असतो, त्याच कालावधीत परकीय कापूस स्वस्त दरात उपलब्ध असल्याने देशांतर्गत बाजारात मंदीचे वातावरण निर्माण होऊन भाव पडतील. .Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर.ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्याबाहेरील देशातील तुलनेने कमी उत्पादन खर्च असलेला ‘राऊंडअप रेडी’ या वाणाचा कापूस कमी दरात उपलब्ध असल्याने जास्त उत्पादन खर्च असलेला ‘बीटी’ कापसाचा भाव पडल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडणार आहे..सरकारने कापूस पिकासाठी मध्यम लांब धागा ७७१० रुपये तर लांब धागा ८११० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे, आजपर्यंतचा अनुभव बघता सरकारकडे स्वतःची परिपूर्ण खरेदीची यंत्रणा उपलब्ध नसल्याने हमीभाव व बाजारभाव या दुष्टचक्रात शेतकरी नाहक भरडला जातो..त्यातच ओलावा निकष १८ टक्क्यांपर्यंत असावा ही शेतकऱ्यांची मागणी असताना सरकारने ही मर्यादा १२ टक्के निश्चित केल्याने पुढील प्रत्येक १ टक्क्याला ८१ रुपये असा भुर्दंड बसणार आहे. सरकारने शेतकरीविरोधी भूमिका न घेता ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.