Ahilyanagar News: देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर विक्री प्रकरणातील राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकांनी जामीन मिळावा म्हणून अहमदनगर सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता तो येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोने यांनी फेटाळून लावला. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून पुढील तपासाचे करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. .पारनेर सहकारी साखर कारखान्यावर साडेचौदा कोटींच्या एका बनावट गहाणखताने कर्जाचा फुगवटा दाखवून राज्य सहकारी बँकेने, पुणे येथील क्रांती शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला या कारखान्याची मालमत्ता विक्री केली होती. त्यानंतर या प्रकरणी कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात धाव घेऊन दाद मागितल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले होते..Tanpure factory : नगर जिल्हा सहकारी बँकेने घेतला तनपुरे कारखान्याचा ताबा.राज्य सहकारी बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरून खरेदीखत नोंदणी केलेले आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी साडेचौदा कोटीचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा दाखवला आहे. पारनेर साखर कारखाना विक्रीची बेकायदा निविदा काढून एकाच कंपनीला फायदा होईल, अशी संपूर्ण विक्रीची प्रक्रिया राबवली, विक्रीसाठी आरोपींशी संगनमत करून त्यांच्या कडील कर चुकविलेला काळा पैसा चलनात आणला. पुढे आरोपींना त्याच मालमत्तेवर सुमारे तीनशे कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला आहे..यापूर्वी आरोपींची रिव्हिजन याचिका सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या गुन्ह्यात प्रमुख आरोपी असणारे राज्य सहकारी बँकेचे माजी सर व्यवस्थापक, नागपूर जिल्हा सहकारी बॅंकेचे विद्यमान प्रशासक अनंत भुईभार व कर्ज वितरण प्रमुख अनिल चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अहमदनगर सत्र न्यायालय नुकताच फेटाळला आहे. .आरोपींनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा,आर्थिक अपहार, विश्वासघात, फसवणूक, बनावटगिरीशी निगडित असल्यामुळे या गुन्ह्याचे तपासासाठी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पारनेर साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष अॅड.रामदास घावटे यांनी याचिका दाखल केली होती..पोलिसांच्या लक्षन्यायालयाने कारखाना विक्री प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करावी, असा आदेश दिलेला आहे. त्यामुळे आता पोलिस आरोपींना कधी अटक करतात, याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.