Nagpur News : अवैध निविष्ठा विक्रीमुळे व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला आहे. त्यातच आता साथी (सीड ऍथॉटीकेशन, ट्रेसेबिलीटी ऍण्ड होलेस्टीक इन्व्हेंट्री) ॲपच्या परिणामी पहिल्या टप्प्यात ३० टक्के व्यवसायिक व्यवसायातून माघार घेतील अशी भीती आहे. त्यामुळे टप्याटप्याने निविष्ठा वितरणाची पूर्ण साखळीच अवैध व्यवसायीकांच्या ताब्यात जाईल, अशी भीती विदर्भातील कृषी सेवा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. .कृषी विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार की , यंदाच्या हंगामात आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर एचटीबिटीची आयात झाली. गावागावात एजंटची व्यवस्था उभी करीत हे अवैध बियाणे विकल्या गेले. त्यानंतरच्या काळात याच एजंटच्या माध्यमातून गावोगावी अनधिकृत तसेच बोगस तणनाशक आणि कीटकनाशकांचाही पुरवठा झाला. .Illegal Fertilizer Sale : विनापरवाना खत विक्री, ९३ हजारांचा साठा जप्त.रीतसर परवाना घेतलेल्या कृषी व्यावसायिकांना याचा फटका बसत त्यांचा व्यवसाय ५० टक्के प्रभावित झाला. कायदेशीररीत्या बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना देखील याची झळ बसत मोठ्या प्रमाणावर बियाणे परत गेले. .यावर नियंत्रणासाठी शासन पातळीवर प्रयत्न होण्याची गरज असताना शासनाने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाला बळी पडत साथी सारखी ऑनलाइन नोंदणीची यंत्रणा उभी केली, असा आरोप आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून बियाणे, कीटकनाशकांची वाढीव दराने विक्री होत होती. त्याच दर्जाच्या निविष्ठा आता भारतीय कंपन्यांकडून कमी दराने.विकल्या जात आहेत. त्यामुळे भारतासारखी मोठी बाजारपेठ गमावण्याची भीती असल्याने एजंटच्या माध्यमातून अनधिकृत विक्री आणि आता साथी पोर्टलवरील सक्तीची नोंदणी या माध्यमातून गावखेड्यातील छोट्या विक्रेत्यांना संपविण्याचे षडयंत्र बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रचल्याचा देखील निविष्ठा विक्रेत्यांचा आरोप आहे. साथी ॲपच्या परिणामी इन्स्पेक्टर राजला देखील प्रोत्साहन मिळेल, अशीही शक्यता वर्तविली गेली आहे..Illegal Pesticide : कीटकनाशकांचा अडीच लाखांचा साठा जप्त .सरकारने स्थापन केली समितीकृषी विक्रेत्यांचा साथी विरोधातील आक्रोश लक्षात घेता सरकारने गुणनियंत्रण अशोक किरनळ्ळी, उपसंचालक (बियाणे), एनआयसी (नॅशनल इन्फार्मेशन सेंटर, मुंबई) संचालक बडेगावकर, एनआयसी (ओरीसा) संचालक, सियाम प्रतिनिधी प्रकाश शिंदे, मासाचे प्रतिनिधी अनिकेत नाके, महाबीज महाव्यवस्थापक, माफदा प्रतिनिधी बिपीन कासलीवाल, शशांक मसवडकर, अभिजित काशीकर, संचालक, बीज प्रमाणीकरण यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. मात्र या समितीला साथी पोर्टल हाताळणा उद्भवणाऱ्या समस्यांच्या निवारणाचेच अधिकार आहेत. त्यामुळे या समितीतून काही दिलासा मिळेल, अशी शक्यता नसल्याचे कृषी विक्रेते सांगतात..बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय कंपन्यांचा डाटा या ॲपच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे. उत्पादन ते विक्रीपर्यंतच्या सर्व माहितीचा त्यामध्ये समावेश आहे. त्याचा उपयोग करीत त्यांना भारतीय बाजारात सहज शिरकाव करणे शक्य होईल, अशी भीती आहे.- कृषी निविष्ठा विक्रेता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.