Nashik News: बेकायदेशीर आणि कमी दर्जाच्या बेदाणा (किसमिस) आयातीमुळे स्थानिक द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि आयातीवर कडक नियंत्रण मिळवावे, अशी आग्रही मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे..देशात परदेशातून मोठ्या प्रमाणावर बेदाण्यांची आयात होत असून, त्यातील काही मालाची गुणवत्ता व नियमांचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे देशातील द्राक्ष उत्पादक शेतकरी तसेच बेदाणा प्रक्रिया उद्योगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..Illegal Raisin Import: राज्यात बेकायदा बेदाणा आयात करणाऱ्यांवर गुन्हे.नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भाग द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बेदाणा उत्पादन व प्रक्रिया उद्योगाशी जोडलेले आहेत. परंतु अनियंत्रित किंवा कमी दर्जाच्या आयातीमुळे बाजारभावावर दबाव येऊन स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्री. भगरे यांनी केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत..Illegal Raisin Import: आयात बेदाण्यामुळे स्थानिक द्राक्ष उत्पादकांचे नुकसान; अधिवेशनात सरकारकडून बैठकीचे आश्वासन.खासदार भगरे यांनी सांगितले, की देशातील शेतकरी व प्रक्रिया उद्योगाचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयात केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या विषयावर त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्र पाठविले असून, आगामी लोकसभा अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे खासदार भास्करराव भगरे यांनी सांगितले..करण्यात आलेल्या मागण्यादेशात आयात होणाऱ्या बेदाण्यांची कडक गुणवत्ता तपासणी करावी.बंदरांवर व सीमारेषांवर तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी.बेकायदेशीर किंवा निकृष्ट दर्जाच्या आयातीवर कठोर कारवाई करावी.देशातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आयात धोरणाचा पुनर्विचार करावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.