Nashik News : विनापरवानागी कीटकनाशके व जैवउत्तेजक विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने ओझर (ता. निफाड) पोलिस ठाण्यात विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित गोविंद भामरे यांच्यासह तिघांकडून एक लाख ६९ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला..जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार, ओझर येथे अप्रमाणित कीटकनाशके व जैवउत्तेजक विक्री होत असल्याचे समजले. त्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी (ता. २६) दिल्ली येथील टूबडी कन्सल्टिंग कंपनीचे सहायक व्यवस्थापक सतीश पिसाळ यांना बनावट ग्राहक बनून कीटकनाशके व जैवउत्तेजकाची खरेदी करण्यासाठी ओझर (ता. निफाड) येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात पाठविले..Illegal Pesticides License Fees : परवाना नूतनीकरणावरील शुल्क वसुली बेकायदेशीर.संशयित भामरे यांना भ्रमणध्वनीद्वारे मालाची मागणी केली. संशयित खंडेराव महाराज मंदिरात माल घेऊन आधीच उपस्थित होते. या वेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी यांनी बिलाची व परवान्याची मागणी केली. त्या वेळी विक्री करणाऱ्या भामरे यांनी कुठल्याही प्रकारचे बिल व परवाना सादर केला नाही. या मालाविषयी संशय बळावल्याने ओझर पोलिस ठाण्यात नेऊन मालाची पंचांसमक्ष शहानिशा केली..बायर क्रॉप सायन्सचे लुना व नेटिवो, तर सिजेंटा कंपनीची स्कोर ही बुरशीनाशक, सिजेंटा कंपनीचे इसाबिऑन व पेन्शिबाओ, वांग प्रा.लि.चे बायो-आर ३०३ हे जैवउत्तेजक आढळून आले. कीटकनाशक व जैव उत्तेजक पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. .त्यातून कीटकनाशके कायदा १९६८ व कीटकनाशक नियम १९७१ मधील विहित तरतुदीनुसार कीटकनाशकाचे नमुने काढण्यात आले. हे नमुने ठाणे येथील चाचणी प्रयोगशाळा पाठविण्यात आले. ओझर पोलिस ठाण्यात संशयित भामरे, वैभव यादवराव सोनवणे व कुलकर्णी (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..Illegal Pesticide Sale : नांदेड जिल्ह्यात अनाधिकृत कीटकनाशक विक्रीचा पर्दाफाश.पक्के बिल घेऊनच खरेदी करावीनाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख तथा कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, डॉ. जगन सूर्यवंशी, कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल धनगर (निफाड) यांनी ही कारवाई केली. .कीटकनाशक निरीक्षक धनगर यांनी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सहायक कृषी अधिकारी अमोल सोमवंशी, योगेश निरभवणे, सतीश पिसाळ यांनी पंच म्हणून स्वाक्षरी केली. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्के बिल घेऊनच कीटकनाशके व जैवउत्तेजकांची खरेदी करावी, असे आवाहन माने यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.