Farmer Awareness: बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैध विक्रीचा प्रयत्त धुळीस मिळवला. या कारवाईत बियाण्यासह तब्बल ८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित तिघांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..जिल्हास्तरीय पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यात एका वाहनातून प्रतिबंधित कापूस बियाण्यांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. तपासणीदरम्यान एका चार चाकी वाहनात अनधिकृत बियाण्यांचा साठा आढळून आला..Illegal HTBT Cotton Seeds: अवैध एचटीबीटी कपाशीचे ५६ लाखांचे बियाणे जप्त.या कारवाईत धूम-२ चे ९९ , २०:२० पींकगार्ड ४G चे २५९ आणि आयपीएल चॅम्पियन या नावाचे १०० असे एकूण ४५८ प्रतिबंधित कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. या बियाण्यांची किंमत ४ लाख ५८ हजार रुपये दर्शविण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन (किंमत ४ लाख रुपये) देखील जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ८ लाख ५८ हजार रुपये आहे..HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त.या प्रकरणात गुलाबराव ठाकरे व शंकर दांदले (रा. सांगोळा, ता. पातूर, जि. अकोला) यांना ताब्यात घेण्यात आले असून विनोद पाटील उर्फ विनोद वाघमारे (रा. शिरला अंधारे, जि. अकोला) हा फरार आहे..फिर्यादी पंचायत समिती कृषी अधिकारी रविकिरण नावकार यांच्या तक्रारीवरून तामगाव (संग्रामपूर) पोलीस ठाण्यात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..ही कारवाई जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अंगाईत, मोहीम अधिकारी प्रमोद गायके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत, कृषी अधिकारी नावकार, गुणनियंत्रण कृषी अधिकारी रोहिणी बोढे (संग्रामपूर), अजिंक्य भटकर (जळगाव जामोद), जानू पवार (शेगाव), सहायक कृषी अधिकारी रवींद्र जाधव आणि कनिष्ठ लिपिक धनंजय देवकर यांनी पोलिसांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली. निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, गुणनियंत्रण तंत्र अधिकारी नितीन लोखंडे आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.