Mumbai News: ग्रुप ग्रामपंचायत गणेशपुरी हद्दीतील तानसा नदीपात्रात स्फोटके व विषारी रासायनिक द्रव्यांचा वापर करून बेकायदा मासेमारी केली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे नदीचे पाणी दूषित होत असून, जलचर प्राणी आणि नदीकाठच्या ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..ग्रुप ग्रामपंचायत गणेशपुरीअंतर्गत गणेशपुरी, भिवाळी आणि उसगाव ही तीन महसुली गावे आहेत. या तिन्ही गावांमधून तानसा नदी वाहते. वर्षभर मुबलक पाणी असलेल्या या नदीच्या पाण्याचा वापर परिसरातील ग्रामस्थ दैनंदिन गरजांसाठी, शेती; तसेच जनावरांच्या पिण्यासाठी करतात. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी मासेमारीसाठी नदीत स्फोटके व विषारी रसायनांचा वापर केल्यामुळे नदीपात्रातील पाणी वापरण्यास अयोग्य ठरत आहे. जनावरांसाठीही हे पाणी धोकादायक बनले आहे. यामुळे संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत समितीकडून करण्यात आली आहे..Bhima River Pollution: शिरापूरला भीमा नदीतील जलपर्णीत वाढ.तानसा नदीत स्फोट घडवून मासेमारी करण्याचे प्रकार अलीकडे वाढले असून, त्यामुळे जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पूर्वी मासेमारीसाठी पारंपरिक पद्धतींचा वापर केला जात होता. पागेर टाकणे, गळ टाकणे, जाळ्यांचा वापर किंवा पाणी उपसून मासेमारी करणे या पद्धतींमुळे जलचर प्राण्यांचे नुकसान होत नव्हते तसेच नदीचे पाणीही दूषित होत नव्हते. मात्र, कमी वेळेत जास्त मासे मिळावेत या उद्देशाने काही महिन्यांपासून तानसा नदीत स्फोट घडवून मासेमारी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे..मासे मृत्युमुखीस्फोटांमुळे मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगू लागतात, ज्यामुळे अल्प परिश्रमात मोठ्या प्रमाणावर मासे मिळतात. तथापि, या प्रकारामुळे मास्यांसह कासव, बेडूक, साप तसेच इतर अनेक जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत..River Pollution: नद्या प्रदूषणमुक्तीसाठी पाण्यावर प्रक्रिया करू.River Pollutionबंदीची मागणीझटपट आणि मोठ्या प्रमाणात मासे मिळावेत म्हणून पाण्यात बॉम्ब फोडून किंवा रसायने टाकून मासेमारी केली जात आहे. त्यामुळे जलचर प्राणी नष्ट होत असून अशा प्रकारावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी प्रदीप जाधव यांनी केली आहे..उदरनिर्वाह धोक्याततानसा नदी ही तालुक्यातील अनेक गावांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. नदीकाठच्या आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थ रोजंदारीचे काम उपलब्ध नसल्यास मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे पारंपरिक व पर्यावरणपूरक मासेमारी पद्धतींचे जतन होणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे..पारंपरिक मासेमारी योग्यमासेमारीसाठी पागेर किंवा गळ टाकणे ही योग्य साधने आहेत. स्फोट घडवून मासेमारी केल्यामुळे प्रदूषण वाढत असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असे गणेशपुरीतील पर्यावरणप्रेमी वैभव पवार यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.