Fertilizer Inspection: अहिल्यानगर जिल्ह्यातील रुंभोडी (ता. अकोले) येथे विनापरवाना शेतकऱ्यांना खत विक्री करताना कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत १ लाख ९१ हजार रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या खताच्या १५५ गोण्या तसेच सुमारे तीन लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी चौघांविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रीसाठी आणलेले खत बनावट असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे..रुंभोडी येथे एक पिकअप वाहन बेकायदेशीरपणे खत विक्रीसाठी येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. कृषी आयुक्त सूरज मांढरे, संचालक सुनील बोरकर, विभागीय सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आणि कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या पथकाने तेथे धाड टाकली..Illegal Organic Fertilizer: वेंगुर्ल्यात विनापरवाना सेंद्रिय खतावर भरारी पथकाची कारवाई.यावेळी दिलीप नथ्थू मालुंजकर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनातून निलेश राजेंद्र सोनवणे आणि सागर दिलीप वाघे हे दोघे खत विक्रीसाठी आले असल्याचे आढळले. कृषी अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्यांच्याकडे खत विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांनी सादर केलेली बिलेही संशयास्पद असल्याचे आढळले. त्यानंतर कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १ लाख ९१ हजार रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या खताच्या १५५ गोण्या तसेच सुमारे तीन लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले..Agriculture Department Action: विनापरवाना खत विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई.अकोले येथील खत निरीक्षकाच्या तक्रारीवरून नीलेश राजेंद्र सोनवणे (मालक, रा. वडगाव पान, ता. संगमनेर), सागर दिलीप वाघे (विक्री प्रतिनिधी, रा. केलवड, ता. राहाता), सुनील शिवाप्पा माळी (नवभारत अॅग्रो इंडस्ट्रीज, कोल्हापूर) आणि निजानंद अशोक क्षीरसागर (मौनगिरी अॅग्रो सायन्स, श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..बनावट खतांविरोधात विशेष मोहीमपिकांची वाढ, चकाकी, टिकवण क्षमता आदींचे अमिष दाखवून शेतकऱ्यांना विविध औषधे, सेंद्रिय खते, रासायनिक विद्राव्ये तसेच अन्य खतांची विक्री करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बनावट खतांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून सातत्याने कारवाई केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.