Nashik News: ‘‘कांदा दरात घसरण होत आहे. त्यामुळे यापूर्वीच केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ यांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला कांदा बाजारात आल्यास ट्रक पेटवून देऊ,’’ असा इशारा रयत क्रांती संघटनेने यापूर्वीच दिला होता. .त्यातच शुक्रवारी (ता. १९) उमराणे (ता.देवळा) येथून कांद्याचा ट्रक लासलगाव रेल्वे स्थानकावरून जाणार असल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी हे ट्रक गाठले. गांधीगिरीच्या मार्गाने सुरुवातीला समज दिली. तसेच, यापुढे नाफेडचे ट्रक रस्त्यावर दिसल्यास आता ते आम्ही पेटविणारच, असा इशारा या वेळी देण्यात आला..Farmer Issue: आत्महत्या, की व्यवस्थेचा बळी!.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून खरेदी केलेला कांदा बाजारात आणला जात आहे. एकीकडे कांद्याला प्रति किलो १७ ते २० रुपयांपर्यंत उत्पादन खर्च येत आहे. तर बाजार समितींमध्ये कांद्याची विक्री कमी दराने होत आहे..याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेने अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून व यापूर्वी देशांतर्गत कांदा विक्रीसाठी ट्रक गेल्यास ते पेटवून देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ट्रक जाणार असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी होत उमराणे येथे कांद्याचे ट्रक अडविले..Onion Farmers Protest: कानगाव येथे कांदा उत्पादकांचे बेमुदत धरणे.‘‘कांद्याचे ट्रक लोड झाल्यास गनिमी पद्धतीने त्याला पेटवण्याची जबाबदारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते स्वतःच्या हिमतीवर घेतील,’’ असा इशारा या वेळी देण्यात आला..या वेळी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे, तालुकाध्यक्ष मयूर नेरकर, उपाध्यक्ष विठ्ठल महाजन, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी, देविदास अहिरे, भास्कर बागूल उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.