Kolhapur News: ‘‘क्षारपडमुक्तीचा हा पायलट प्रोजेक्ट केवळ आलास गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्वी करावा, शासन, जलसंपदा विभाग, अधिकारी व शेतकरी यांच्या समन्वयातून हा उपक्रम राज्यात आदर्श ठरवता येईल,’’ असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. .क्षारपड क्षेत्र सुधारणा पथदर्शी भूमिगत चर योजनेतील महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचा राज्यातील २२६ एकर क्षेत्रातील पहिल्याच पायलट प्रोजेक्टचा प्रारंभ आलास (ता.शिरोळ) येथील दानोळे तळ येथे करण्यात आला. या प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते..Women Drone Pilot : गुरुंजवाडीची लेक बनली ड्रोन पायलट ; नूतनचा प्रेरणादायी प्रवास.हा प्रकल्प शिरोळ तालुक्यात लागू करण्यात आला. शेतकऱ्यांना २० टक्के हिस्सा म्हणजेच २६ हजार ८५० रुपये भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ कर्जव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. .Drone Pilot Training : ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेसाठी ‘वनामकृवि’चा ‘ग्राउंडजिरो’शी करार.शासनाच्या माध्यमातून ८० टक्के म्हणजे १ लाख ७ हजार ३९० रुपये मिळाणार असल्याने शेतकरी वर्गाने पूर्ण सहभाग घेत आवश्यक रक्कम जमा करून या पायलट प्रोजेक्टची सुरुवात केली..शेतकरी नेते सावकार मादनाईक, अभियंता अमरजित बिराजदार सरपंच सचिन दानोळे, प्रभाकर मोरे, शेतकरी सागर दानोळे, अण्णासाहेब क्वाने, अब्दुल खवाल यांची मनोगते झाली. याप्रसंगीफजलेअल्ली पाटील, धनाजीराव जगदाळे, चांदपाशा पाटील, दादेपाशा पटेल आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.