Parali News: शेती आणि शेतकरी वाचला तरच देश पुढे जाईल. शेतकऱ्याची उत्पन्न तितके वाढावे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये हा संकल्प घेऊन आपण कृषिमंत्री या नात्याने काम करत, असल्याची भावना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केली..सिरसाळा (ता. परळी) येथील ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून शुक्रवारी (ता. ७) शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याआधी ग्लोबल विकास ट्रस्टच्या सभागृहात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मराठवाड्यातील निवडक शेतकरी, अधिकारी व शास्त्रज्ञ यांच्याशी शेती व शेतकरी प्रश्नांच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. ७) संवाद साधत मराठवाड्याच्या एकूणच शेती शेतकरी अवस्था व मातीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला..Farmers Welfare: तामिळनाडूत शेतकऱ्यांना पीकविमा, पीककर्ज, बियाणे, खते मिळणार एकाच ठिकाणी; १ हजार फार्मर्स सेंटर्सची घोषणा.त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयांक गांधी, केंद्रीय कृषी सहसचिव अजितकुमार साहू, राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उद्योजक विक्रमकुमार व रवी झुनझुनवाला, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी, हरिश्चंद्र वंगे, ग्लोबल विकास ट्रस्टचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम.बी. पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. .श्री. चौहान म्हणाले, की लोकशाहीत मंत्री जनसेवक असतो. शेतकऱ्यांची सेवा करायची तर त्यांचे उत्पन्न वाढवावेच लागेल. त्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टचे प्रयोग आपण देशभर घेऊन जाऊ. सुरुवातीला ग्लोबल विकास ट्रस्टचे अध्यक्ष श्री. गांधी यांनी कृषिमंत्र्यांसमोर ट्रस्टच्या आजवरच्या कार्याची माहिती दिली..Farmer Welfare : राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी.रेशीम उद्योगात भरारी घेतलेले गेवराई तालुक्यातील रुई गाव, मल्लनाथपूरची रेशीम गावच्या दिशेने वाटचाल, भारत थांबणार नाही म्हणत फळ पिकातून तसेच पूरक उद्योगातून शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी होत असल्याची माहिती ही श्री. गांधी यांनी दिली. ट्रस्टचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पाटील यांनी, समृद्ध माती तसेच आर्थिक फायदा देणारी शेती यावर ट्रस्टचे कशा पद्धतीने काम सुरू आहे याविषयीची मांडणी केली..रुईचे सरपंच कालिदास नवले यांनी रुई गावाने आजवर केलेल्या रेशीम शेतीतील क्रांतीचा उलगडा केला. भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टने कशी मदत केली त्यामुळे पाणी पातळी कशी वाढली याची माहिती देऊन एक एकरापेक्षा जास्त तुती लागवड करणाऱ्यांना अधिकचे अनुदान मिळावे अशी मागणी केली..कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईचे प्रमुख डॉ. वसंत देशमुख, खामगाव कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. हनुमान गरड, बारामती येथील जैविक अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे डॉ. संग्राम चव्हाण, अंबाजोगाई कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कर्डिले, अटारीचे शास्त्रज्ञ शाकीर अली सय्यद आदींनी शास्त्रज्ञांची भूमिका व शेतकऱ्यांसाठी योगदान देण्याची तयारी यावर प्रकाश टाकला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.