Raigad News: उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांच्या पसंतीस उतरणाऱ्या ताडगोळ्यांचा हंगाम सध्या रेवदंडा व परिसरात अंतिम टप्प्यात आला आहे. ताडगोळा वर्षातून दोन वेळा विक्रीस येत असून, साधारण नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत पहिला टप्पा आणि त्यानंतर ऐन उन्हाळ्यात मुख्य हंगाम सुरू होतो. सध्या बाजारात ताडगोळ्यांना आकारमानानुसार डझनाला १५० ते २०० रुपये, असा दर मिळत आहे..या वर्षी पर्यटनाचा हंगाम सुरू झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत ताडगोळांची बाजारातील आवक कमी असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांपेक्षा या काळात पर्यटकांचीच मागणी अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील चौल येथील पर्वतवासी दत्तमंदिराची पाच दिवसांची जिल्ह्यातील महत्त्वाची यात्रा नुकतीच पारपडली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्यांची विक्री झाली..Sugarcane Crushing Season: ऊस गाळपासाठी कारखान्यांनी पकडली गती.सध्या ख्रिसमस तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने ताडगोळ्यांना विशेष मागणी आहे. पर्यटक थंडावा देणाऱ्या आणि नैसर्गिक पेयासारख्या ताड फळांनाप्राधान्य देत असल्याचे विक्रेते सांगतात. आठवडा बाजारात ताडगोळा विक्रेत्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. विक्रेत्यांच्या मते येत्या १० दिवसांत हा ताडगोळ्यांचा सध्याचा हंगाम संपुष्टात येण्याची शक्यता आहे..Sugarcane Crushing Season: ‘केजीएस’ कारखान्याचे ऊस गाळप सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू .त्यानंतर पुन्हा ऐन उन्हाळ्यात ताडगोळ्यांचा खरा हंगाम सुरू होणार असून, त्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होण्याची अपेक्षा आहे..पाडेकऱ्यांची कमतरताताडगोळे काढण्यासाठी आवश्यक असणारे पाडेकरी (ताडावर चढणारे कामगार) उपलब्ध होत नसल्याने बागायतदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा परिणाम थेट आवकवर होत असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. कामगारांच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी ताडगोळे झाडांवरच राहून जात असल्याचेही चित्र आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.