Nanded News : शासनाने हैदराबाद गॅझेट मंजूर केल्याने ओबीसीतून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा जीआर कमी वेळात आल्यामुळे यात अभ्यासाअंती त्रुटी व उणिवा आढळून आल्यास त्यामध्ये अमेंडमेंट (दुरुस्ती) करण्याचा शब्द राज्य शासनाच्या वतीने उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. .मात्र या जीआरमधील ‘पात्र’ शब्दात मेख आहे, असे मत ॲड. यशवंत पाटील वायफणकर यांनी व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला यश आले असून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. .Maratha Reservation: ‘मराठा- कुणबी’करिता हैदराबाद गॅझेटियर लागू.यासाठी तातडीने काढलेल्या अध्यादेशामध्ये संदिग्ध शब्दरचना करत अनेक गोष्टींचा उलगडा केलेला नाही. तत्कालीन पाच जिल्ह्यातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी, कुणबी- मराठा किंवा कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत असे सांगताना ‘पात्र’ म्हणजे नेमक्या कोणत्या. .Maratha Reservation: मागण्या मान्य, पुढे काय?.या पात्रतेचे निकष यामध्ये दिलेले नसल्याची प्रतिक्रिया हदगाव तालुक्यातील वायफना बुद्रुक येथील भूमिपुत्र तथा सर्वोच्च व उच्च न्यायालयातील ॲड. यशवंत पाटील वायफणकर यांनी दिली. .ॲड. पाटील हे मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील हुतात्मा जयवंतराव पाटील वायफणकर यांचे पणतू व साखर कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव पाटील यांचे पुत्र आहेत. त्यांनी मागील पाच दिवसापासून मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी ॲड. आशिष राजे गायकवाड, ॲड. वैभव कदम यांच्यासोबत कायद्याच्या कसोटीवर लढा यशस्वी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत प्रयत्न केले आहेत..मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची कायदेशीर लढाई समाजकार्य व आरक्षण लढ्याचा घटक म्हणून मोफत लढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.- ॲड. यशवंत पाटील वायफणकर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.