Akola News: ‘सीसीआय’ची (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी जिल्ह्यात सुरू झाली आहे. प्रामुख्याने अकोट येथील खरेदी केंद्रावर सोमवारी (ता.१७) कापूस खरेदीचा प्रारंभ झाल्यानंतर आर्द्रतेचा मुद्दा तापला आहे. कापसात १५ ते २० टक्के दरम्यान आर्द्रता असल्याने प्रशासन हा कापूस घ्यायला तयार नाही. तर आर्द्रता मोजमापावर संशय घेतला जात असल्याने गोंधळाची स्थिती अद्यापही कायम आहे. .सीसीआयमार्फत कापूस खरेदीला सुरुवात झाली. मध्यम धाग्याचा कापूस ७७१०, तर लांब धाग्याच्या कापूस ८११० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जातो. सध्या कापसात आर्द्रता अधिक असल्याने हा कापूस खरेदी करण्यास यंत्रणांनी नकार दिला होता. ८ ते १२ टक्के आर्द्रतेचा कापूसच खरेदी केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. यामुळे अर्ध्याहून अधिक वाहने परत पाठवल्याने गोंधळ झाला होता..Cotton Market: ‘सीसीआय’ने कापूस खरेदीची मर्यादा एकरी १२ क्विंटल करावी.मंगळवारी (ता.१८) पुन्हा बाजार सुरू होताच हाच मुद्दा उपस्थित झाला. सहा वाहने दुपारपर्यंत आली होती. त्यातील तीन वाहनांतील कापूस नियमानुसार होता. उर्वरित वाहनातील कापसात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने खरेदी केला गेला नाही. खरेदी झालेल्या कापसाला ७८६५ रुपयांचा दर दिला गेला. अकोट ‘ए’ आणि अकोट ‘ब’ अशा दोन केंद्रांसाठी या ठिकाणी खरेदी केली जात आहे..व्यापाऱ्यांना विकण्याची वेळसीसीआयच्या केंद्रावर विक्रीला नेलेला कापूस आर्द्रतेच्या कारणाने खरेदी केला जात नाही. त्यामुळे हा कापूस आता खासगी व्यापाऱ्यांकडून जात आहे. सोमवारी परत गेलेला बहुतांश कापूस अकोटमधील खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला. परत गेलेली अनेक वाहने थेट खासगी जिनिंगच्या केंद्रावर जात आहेत..Cotton Procurement: ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रांवर निगरणी समित्या स्थापन .आर्द्रतेचा मुद्दा वादाचे कारणकापूस विक्रीसाठी आणणारे शेतकरी हे आपला कापूस योग्य असल्याचे समर्थन करीत आहेत. तर अधिकारी हे आर्द्रतेवर बोट ठेवत कापूस खरेदी करीत आहेत. यामुळे सोमवारी एकच गोंधळ झाला होता. आधीच या वर्षात उत्पादन खर्च वाढलेला असून शेतकऱ्यांना आता कापूस विक्रीसाठी आणताना वाहन भाडे, भराईसाठीही वेगळा खर्च करावा लागतो आहे. त्यातच वाहन रिजेक्ट होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप कायम आहे..मी सोमवारी अकोट केंद्रावर ३० क्विंटल कापूस विक्रीसाठी आणला होता. माझ्या कापसात १४ टक्के आर्द्रता निघाल्याने तो खरेदी केला गेला नाही. त्यामुळे मला हा कापूस खासगी व्यापाऱ्याला ६९८० दराने विकावा लागला. वाहन भाडे, भराईचा खर्चच प्रति क्विंटल १२० रुपये लागला होता. शासनाने आर्द्रतेचे धोरण पारदर्शक राबवण्याची गरज आहे. कुणाचा माल सोडून देणे, कुणाचा न घेणे योग्य नाही. शेतकरी आधीच अडचणीत असताना भेदभाव व्हायला नको.अभिजित गावंडे, कापूस उत्पादक शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.