Pune News : अतिपावसामुळे राज्याच्या डोंगरी भागातील हळव्या भाताची अतोनात हानी झाली आहे. भात उत्पादक पट्ट्यांमधील अनेक गावांमध्ये पीक सडून काळे पडले आहे. काही ठिकाणी काढणीला आलेला भात आडवा झाला आहे, तर बचावलेल्या पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. .राज्यात जून ते सप्टेंबरअखेर सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस होतो. प्रत्यक्षात तो १०९१ मिलिमीटर (१०९ टक्के) बरसला आहे. कोकण, नाशिक, पुणे आणि नागपूरच्या भात उत्पादक पट्ट्यात ऑक्टोबरमध्येही सतत पाऊस होतो आहे. त्यामुळे राज्यात १५ लाख हेक्टरवरील भात पिकासमोर प्रश्नचिन्ह उभे आहे. ११५ ते १२० दिवसांच्या अर्ली लागवडीचे भातपीक वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Paddy Crop Damage : भाताच्या कोठारावर अस्मानी संकट .१२५ ते १३५ दिवसांच्या वाणांच्या लागवडी फुलोऱ्यात होत्या. अतिपावसामुळे फुलोऱ्यातील परागकण पडले आहे. काही ठिकाणी फुलात पाणी साचून ओंबी काळी पडल्याचे शेतकरी सांगतात. कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘हळव्या’चे नुकसान बहुतेक ठिकाणी आहे. काही गावांमध्ये गणेशोत्सवापासून पीक तयार झालेले होते..परंतु, पीक दाणे भरलेले असताना पावसाने शेतात आडवे झाले आहे. १४० दिवसांच्या पुढील लेट वाणांची ‘गरवी’ शेत पोटरीत व निसवण्याच्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांना आता याच वाणांपासून उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र, पाऊस दिवाळीच्या आसपास चालू राहिल्यास ‘गरव्या’चेही नुकसान होऊ शकते..Paddy Cultivation: दर्जेदार भात उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर.लवकर व मध्यम कालावधीच्या भात वाणांना अतिपावसाचा फटका बसला आहे. डोंगरी भागात काढणीला आलेल्या ‘हळव्या’चे नुकसान दिसते आहे. मात्र, उघडीप मिळाल्याने ‘गरव्या’ भाताला फार अडचण येईल, असे वाटत नाही.डॉ.भरत वाघमोडे, भात विशेषज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत.एरवी दसऱ्यापासूनच भात कापणी सुरू होत असते. परंतु, यंदा पावसाने पिकात दाणाच भरलेला नाही. आम्हाला आता मुख्य पीक सोडाच, परंतु वैरणीचीसुद्धा चिंता लागून राहिली आहे.दिगंबर चिमा घुटे, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी, मु. पो. घाटघर, ता. जुन्नर, जि. पुणे.मावळात गेल्या ५० वर्षांपासून मी भात शेती करतो आहे. मात्र, मेपासून ऑक्टोबरपर्यंत इतका सततधार पाऊस प्रथम पाहतो आहे. भातशेतीचे यंदा होणारे नुकसान मोठे असेल.मनोहर काळू घुटे, भात उत्पादक शेतकरी, मु. पो. चिंचेची वाडी, ता. जुन्नर, जि. पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.