Farmer Losses: रेणापूर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी बुधवारी (ता.एक) अवकाळी पावसाने जोरदार मारा केला. यात पिकांचे नुकसान झाले. अनेक भागातील झाडेही उन्मळली. दरम्यान, गरसुळी, चाडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे..तालुक्यात गरसुळी, मोरवड, तत्तापूर व चाडगावात गारपीट तर रेणापूर, पानगाव खरोळ्यासह विविध गावांमध्ये बुधवारी वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह दमदार पावसास सुरवात झाली. गरसुळी, मोरवड, तत्तापूर व चाडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली तर तालुक्यातील बहुतांश गावात दमदार पाऊस झाला. .Unseasonal Rain Crop Damage: 'अवकाळी'नं गहू, मका, ज्वारी पीक जमीनदोस्त, कांद्याची पोती भिजली, 'जगायचं कसं?' शेतकऱ्यांचा आर्त सवाल.या वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने काही गावात झाडे उन्मळून पडली ज्वारी, गहु, हरभरा व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी आंब्याच्या फळबागेला फटका बसला..Unseasonal Rain: साडेबारा हजार हेक्टरला पाऊस, गारपिटीचा फटका .यात झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडलेला होता. या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत..लातूर शहरात पूर्वमोसमी पाऊसशहरात अवकाळी पावसाने बुधवारी (ता.एक)रात्री हजेरी लावली. यामुळे दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दोनच दिवसांपूर्वी हवामान विभागाने लातूरसह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. .जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटही झाली. शहर परिसरात रात्री आठ वाजता पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, पाच एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस व गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.