Land Records: खरेदीखत हे नोंदणीकृत असले पाहिजे, असा कायदेशीर नियम आहे. खरेदीखताचे दुय्यम निबंध कार्यालयात नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्काचा भरणा करावा लागतो. हे मुद्रांक शुल्क त्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या सहा ते सात टक्के एवढ्या दराने असेल.