डॉ भरत मालुंजकरWheat Rust Disease: गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण झाले आहे. त्यात हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले आहे तसेच तापमानातही थोडी वाढ झाली आहे. अशा वातावरणात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढवून पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन पिकाचे संरक्षण करावे. .ढगाळ वातावरणाचा परिणामजास्त आद्रता आणि ढगाळ वातावरण या वातावरणात गहू पिकावर करपा आणि तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण आणि आद्रता वाढल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. ढगाळ वातावरणामुळे पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येतो त्यामुळे अन्न निर्मिती कमी होते त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो..Rabi Crop Management: ढगाळ हवामानात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी?.रोगांवर उपायोजनागहू पिकावर काळा व नारंगी तांबेरा करपा गव्हाच्या दाण्यावरील काळे टोक या रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. या रोगांपैकी काळा व नारंगी तांबेरा या दोन्ही महत्त्वाच्या हानिकारक रोगांमुळे ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. तांबेरा रोग नियंत्रणासाठी तांबेरा रोगाची लागण दिसून येतात मॅन्कोझेब 75 डब्ल्यूपी किंवा किंवा झायनेब 75 डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून किंवा टेब्युकोनॅझोल ५० टक्के अधिक ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबीन २५ टक्के डब्ल्यू पी डब्ल्यू जी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी. तांबेरा रोगापासून बचाव करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या तांबेरा प्रतिबंधक वाणांची पेरणीसाठी प्रथम प्राधान्याने निवड करावी.करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्झिक्लोराईड अधिक मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची प्रत्येकी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात..कीड नियंत्रणगहू या पिकावर मावा, खोडमाशी व खोडकिडा यापासून नुकसान पोहोचते. मावा कीड दिसून येताच मेटारायझियम अॅनीसोप्ली ५० ग्रॅम किंवाबीव्हेरिया बॅसियाना ५० ग्रॅम किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.मावा किडीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी थायोमेथॉग्जाम २५ टक्के विद्राव्य दाणेदार १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात पंधरा दिवसाच्या अंतराने गरजेनुसार एक किंवा दोन फवारण्या कराव्यात..Wheat Aphid: गव्हावरील मावा नियंत्रणाच्या ३ सोप्या पद्धती.पाण्याची काळजीगहु या पिका वरील रोग आणि किडींचा बंदोबस्त करण्यासाठी पिकाची पाहणी करून आवश्यकतेनुसार बुरशीनाशक कीटकनाशकाची फवारणी करावी.ढगाळ वातावरणात पिकाला जास्त पाणी देऊ नये पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवावे जेणेकरून जमिनीची योग्य ओल आणि आद्रता योग्य राखता येईल..झोपलेला गहूराज्यात काही भागात वारा-पावसामुळे पाऊस जवळपास झोपून गेला आहे. अशा परिस्थितीत पिकाचे व्यवस्थापन करणे तसे शक्य नसते. कमी दिवसांचा, फुलोरा अवस्थेतील गहू ऊन आल्यावर उभा होतो. त्यावर अन्नद्रव्यांची फवारणी करुन त्याला वाचविता येते. यासाठी परंतु ओंब्या भरत असणारा गहू हा पुन्हा उभा राहण्याची शक्यता फार कमी राहते..अन्नद्रव्यांची फवारणीऊन आल्यावर पुन्हा उभा राहिलेल्या गव्हामध्ये फुले सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड २ याची १० मिली प्रति लिटर पाणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आणि ६० ते ६५ दिवसांनी फवारणी करावी. किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची २ टक्के (२०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) तीव्रतेचे द्रावण करून पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनी फवारणी करावी. किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ या विद्राव्य खताची १०० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी..डॉ भरत मालुंजकर, मो. ९४०४०४९७११ वरिष्ठ संशोधन सहायक, कृषि संशोधन केंद्र निफाड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.