Cloudy Weather Disease: मागील आठवड्यापासून अचानक ढगाळ हवामान असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी ज्वारीला थंडी आणि ऊन दोन्ही योग्य प्रमाणात गरजेचे असते परंतु जेव्हा ढगाळ हवामान किंवा अचानक येतो; तो सोबत किडी रोगांना घेऊन येतो आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी घेऊन येतो. परंतु वेळेत केलेल्या योग्य फवारण्या किडींचा प्रादुर्भाव थांबवू शकतात आणि उत्पादन वाचवू शकतात..ज्वारीचे पीक सध्या वेगवेगळ्या अवस्थेत आहे. वेळेवर पेरणी केलेली ज्वारी सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे तर उशिरा पेरणी केलेली ज्वारी सध्या फुलोरा अवस्थेत आहे. त्यामुळे ढगाळ हवामानाचा पिकावर त्याच्या अवस्थेनुसार परिणाम होऊ शकतो. जसे, दाणे भरण्याच्या अवस्थेत असणाऱ्या ज्वारीवर ढगाळ हवामानामुळे चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर फुलोरा अवस्थेतील ज्वारीवर सध्या लष्करी अळीचा आणि चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. .Jowar Cold Stress: थंडीमुळे ज्वारीचे पीक पिवळे पडल्यास काय करावे?.मावा कीडमावा कीड पानांतून व पोंग्यातील रस शोषते. पाने आकसून, झाडाची वाढ खुंटते. दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो. मावा किडीच्या शरीरातून पाझरलेल्या गोड चिकट द्रवावर काळी बुरशी वाढते. पानावर बुरशीचा काळा थर जमा होऊन अन्ननिर्मितीच्या क्रियेत बाधा येते. त्यास चिकटा पडला असे म्हणतात. कालांतराने झाडाची पाने व पोंगे पिवळे पडून वाळतात. .मावा किडीचे नियंत्रणमावा कीड विषाणुजन्य रोगाचा प्रसारही करते. प्रादुर्भाव जास्त असल्यास इमिडाक्लोप्रिड (७० टक्के WG - ६ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी) किंवा थायोमेथोक्झाम १ ग्रॅम प्रती १० लिटरची फवारणी फायदेशीर ठरते. चिकट्याचा प्रादुर्भाव झालेली पाने आणि कणसे काढून नष्ट करावी. त्यामुळे उरलेल्या शेतात बुरशीचा प्रसार होत नाही..लष्करी अळीही अळी ज्वारीसोबत इतर अनेक पिकांवर येते आणि पिकाचे मोठे नुकसान करते. ढगाळ हवामान, आर्द्रता, आणि पाऊस या अळीसाठी पोषक असतो. त्यामुळे अळी वाढ झपाट्याने होते. ही अळी ती पानांना खरडून खाते आणि त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात आणि दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे पाडतात आणि पानाच्या कडा खातात. मोठ्या अळ्या पानाला पूर्ण खातात. झाडावर केवळ पानाच्या शिरा उरतात त्यामुळे पीक फाटल्यासारखे दिसायला लागते. त्यामुळे ही कीड पिकाचे मोठे नुकसान करते. .लष्करी अळीचे नियंत्रणलष्करीचे अळीचे नियंत्रण हे तिच्या अवस्थेनुसार आणि प्रादुर्भावानुसार करावी लागते. ज्वारीसाठी कोणतेही लेबलक्लेम रासायनिक औषध नसल्याने जैविक कीटकनाशकांवर भर द्यावा. यासाठी पिकावर अझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. जैविक नियंत्रणासाठी मेटारायझीम रिलाई किंवा मेटारायझीम अॅनिसोप्ली (१.१५ टक्के विद्राव्य पावडर) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.