Livestock Feed Management: यंदा पाऊस कमी आहे. येत्या काळातही पाऊस कमीच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत कमी कालावधीत, कमी खर्चात तयार होणारा, जास्त काळ टिकणारा आणि पोषणमूल्य असलेला मुरघास फायदेशीर ठरतो. मुरघास तयार करून शेतकरी जवळपास वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन करू शकतात..मुरघास हा सहसा मका, ज्वारी, बाजरी या पिकांपासून बनवला जातो. मक्याचे पीक पोटरीवर येऊन दाणे दुधाळ अवस्थेत असताना कापावे. ज्वारी आणि बाजरीचे पीक फुलोऱ्यावर असताना कापणी करावी. चाऱ्याची कुट्टी करून ही कुट्टी मुरघासाच्या खड्ड्यात थराने भरावी.प्रत्येक थर भरताना त्यावर चांगला दाब द्यावा. कुट्टीमध्ये हवा राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. हवा राहिल्यास बुरशी वाढून मुरघास खराब होऊ शकतो..Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन.चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्यासाठी १.५ टक्के गुळाचे पाणी आणि १ टक्का युरिया पाण्यात मिसळून कुट्टीच्या प्रत्येक थरावर फवारावे.चांगल्या प्रतीच्या मुरघासाला आंबट वास येतो. त्याचा रंग फिकट हिरवा किंवा तपकिरी असतो. मुरघासाचा सामू साधारण ३.५ ते ४.५ असतो..खड्डा पूर्ण भरल्यानंतर त्याच्या पृष्ठभागावर एक ते दोन फूट उंच वैरणीचा ढिग करावा. त्यावर निरुपयोगी गवत किंवा कडब्याच्या पेंड्याचा थर द्यावा. त्यानंतर शेण आणि चिखलाच्या मिश्रणाचा थर देऊन खड्डा पूर्णपणे झाकावा. त्यावर पॉलिथिन अंथरूनही हवाबंद करता येते. मुरघास तयार होण्यासाठी साधारण ४५ ते ६० दिवस लागतात. त्यानंतर खड्ड्याच्या एका बाजूला छिद्र करून दररोज आवश्यक तेवढाच मुरघास काढावा. मुरघास काढल्यानंतर उघडलेला भाग पुन्हा वाळलेले गवत किंवा अन्य साहित्याने झाकून ठेवावा..Fodder Management: चारा टंचाई असताना वापरा सोप्या टिप्स.कुट्टीतील ओलावा महत्त्वाचामुरघास तयार करताना चाऱ्यातील ओलावा महत्त्वाचा असतो. चाऱ्यात साधारण ६५ ते ७० टक्के पाण्याचे प्रमाण असणे योग्य आहे. त्यापेक्षा जास्त पाणी असल्यास कुट्टी दोन ते चार तास सुकू द्यावी. जास्त ओलाव्यामुळे मुरघास सडण्याची शक्यता असते. बॅगेत मुरघास तयार करताना कुट्टी भरल्यानंतर ती व्यवस्थित दाबावी आणि बॅगमधील हवा पूर्णपणे काढून बंद करावी. शक्य असल्यास व्हॅक्यूम पंपाचा वापर करता येतो..बॅग सुरक्षित ठिकाणी ठेवामुरघासाच्या बॅगा उंच आणि कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात. पावसाचे किंवा छतावरचे पाणी बॅगवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. उंदरांनी बॅग कुरतडल्यास त्यातून हवा आत जाऊन मुरघास खराब होऊ शकतो. त्यामुळे बॅगा जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीवर लाकडी फळ्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवाव्यात..जनावरांना किती मुरघास द्यावा?जनावरांच्या शरीराचे वजन आणि आहारानुसार मुरघासाचे प्रमाण ठरवावे. सर्वसाधारणपणे दुभत्या जनावराला दररोज १६ ते २० किलो मुरघासासोबत चार ते सहा किलो वाळलेला चारा किंवा कडब्याची कुट्टी देता येते. मुरघासासोबत संतुलित आहार देणेही आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.