डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील व डॉ. अशोक कडलग.Ratoon Sugarcane Fertilizer: खोडवा ऊसाच्या नियोजनावर त्याचे उत्पादन किती मिळू शकेल हे ठरते. खोडवा उसाला योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खत दिल्यास त्याचे उत्पादन हे लागण उसापेक्षाही जास्त मिळते. सेंद्रिय खत, रासायनिक खत आणि सूक्ष्मअन्नद्रव्य आणि इतर फवारण्या देऊन शेतकरी खोडव्याला खताचं व्यवस्थापन करु शकतात..१. खोडव्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापरखोडव्यामध्ये शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करीत नाहीत त्यामुळे खोडवा उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे खोडवा उत्पादन जास्त मिळण्यासाठी, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढण्यासाठी एकरी सेंद्रिय खत जसे की शेणखत १० टन किंवा कंपोस्ट खत ५ टन किंवा गांडूळ खत २ टन किंवा कारखान्याची कुजलेली मळी २ टन किंवा कोंबडी खत २ टन आणि जैविक खत ट्रायकोडर्मा, स्फुरद विरघळवणारे जीवाणू, पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे १ ते २ किलो सेंद्रिय खतात मिसळून त्याचा वापर करावा..Khodwa Us Niyojan: ऊस उत्पादन वाढवण्यासाठी खोडव्याचे नियोजन कसे कराल?.२. रासायनिक खतांच्या पद्धतीखोडव्याला रासायनिक खत तीन पर्यायांनी देता येते. तरी तज्ज्ञांच्या मते ही खत मात्रा माती परीक्षण करुनच देणे फायदेशीर राहते.पहिला पर्याय- यामध्ये सरळ खतांचा वापर होतो. ऊस तोडणी झाल्यावर १५ दिवसांच्या आत युरियाचे एक पोते, सिंगल सुपर फॉस्फेटचे ३ पोते आणि म्युरेट ऑफ पोटॅशचे १ पोते प्रती एकर या प्रमाणाने द्यावे. यानंतर ऊस तोडणी झाल्यानंतर दीड महिन्यांनी युरियाचे १ पोते द्यावे. आणि शेवटची पाळी मोठी बांधणी करताना युरियाचे २ पोते, सिंगल सुपर फॉस्फेटचे ३ पोते, आणि म्युरेट ऑफ पोटॅशचे १ पोते द्यावे..दुसरा पर्याय- या पर्यायात सरळ खते आणि मिश्र खतांचा वापर होतो. १०:२६:२६ हे खत उसाची तोडणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत एकरी २ पोते द्यावे सोबत युरियाचे एक पोते द्यावे. ऊस तोडणी झाल्यानंतर दीड महिन्यांनी १.२ पोते युरिया द्यायचा. तर पेरणी मोठी बांधणी करताना १०:२६:२६ हे खत २ पोते आणि युरिया दीड पोते द्यावे.तिसरा पर्याय- या पर्यायात १९:१९:१९ आणि युरिया खताचा वापर केला जातो. ऊस तोडणीनंतर १५ दिवसात २ पोते १९:१९:१९ खत द्यावे. तर तोडणीनंतर दीड महिन्यांनी २ पोते युरिया प्रती एकर या प्रमाणात द्यावा. सोबत मोठी बांधणी करताना दोन पोती १९:१९:१९ आणि १ पोते युरिया द्यावे..सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांचा वापरखोडवा उसासाठी प्रती एकरी सूक्ष्मअन्नद्रव्यांची मात्रा द्यावी.फेरस सल्फेट १० किलोझिंक सल्फेट ८ किलोमँगेनीज सल्फेट १० किलोबोरॅक्स २ किलोसोडियम मॉलीब्डेट १ किलोकॉपर सल्फेट ५ किलो.Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान.३. गंधक आणि सिलिकॉन अन्नद्रव्यांचा वापररासायनिक खतांचा पहिला हफ्ता देताना २४ किलो प्रति एकर मूलद्रवी गंधक तसेच सिलिकॉनसाठी १६० किलो बगॅसची राख आणि १ लिटर सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जिवाणू वापरावेत.४. सॉइल हेल्थ आणि ह्यूमिक ऍसिडसॉइल हेल्थ १ लिटर २०० लिटर पाण्यात प्रति एकर मिसळून खोडवा ठेवल्यानंतर १५, ४५,९० आणि १२० दिवसांनी आळवणी करावी. ह्यूमिक ऍसिड १ लिटर २०० लिटर पाण्यात प्रति एकर खोडवा ठेवल्यानंतर आणि १२० दिवसांनी आळवणी करावी..५. मल्टीन्यूट्रीयंट फवारणीएकरी मल्टीमॅक्रो न्यूट्रियंट ३ लिटर ३०० लिटर पाणी या प्रमाणात आणि मल्टीमायक्रोन्यूट्रियंट २ लिटर २०० लिटर पाणी घेऊन खोडवा ठेवल्यानंतर ६० आणि ९० दिवसांनी फवारणी करावी.६. वसंतऊर्जा फवारणीएक एकरासाठी १ लिटर वसंतउर्जा २०० लिटर पाण्यात घेऊन खोडवा ठेवल्यानंतर ३०, ६०, ७५ आणि ९० दिवसांनी फवारणी करावी..७. केवडा नियंत्रणखोडव्यामध्ये केवडा नियंत्रणासाठी फेरस सल्फेट, झिंक सल्फेट आणि मँगेनीज सल्फेट प्रत्येकी ५ ग्रॅम आणि युरिया २५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन १० ते १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात..डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील व डॉ. अशोक कडलगवसंतदादा शुगर इन्टिट्यूट, मांजरी बु. पुणे(मो. न. ९८६०८७७०४९, ९७३७२७५८२१).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.