Crop Disease Prevention Tips: राज्यात अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे. त्यामुळे अनेक शेतांमध्ये काही काळ पाणी साचले होते. अशा परिस्थितीनंतर सोयाबीन पिकामध्ये खोडकुज आणि बांधाकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसानंतर पिकाची नियमित पाहणी करून सुरुवातीलाच रोग ओळखून नियंत्रण करावे..मुळकुज (चारकोल रॉट) कशी ओळखाल?सुरुवातीला पिकाची पाने जमिनीकडे झुकतात. हळूहळू ती मलूल पडतात. कालांतराने ती पिवळी पडून गळण्यास सुरुवात होते. अशी लक्षणे दिसू लागल्यास रोगाची सुरुवात झाल्याची शक्यता असते.मुळकुज झालेली झाडे उपटून पाहिल्यास मुळांची साल सहज निघते आणि मुळे पांढरट दिसू लागतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर संपूर्ण झाड वाळते. मुळांवर करड्या-भुरकट रंगाची बुरशी दिसू लागते. या अवस्थेतील झाडे पुन्हा पूर्ववत होत नाहीत. त्यामुळे अशी झाडे शेतातून काढून योग्य पद्धतीने नष्ट करावीत..Kharif Crop Planning: पावसाच्या परिस्थितीनुसारच पीक नियोजन .बांधाकुज (कॉलर रॉट) रोगाची लक्षणेबांधाकुज झालेल्या झाडांमध्ये मुळाजवळ आणि खोडाच्या बुंध्याभोवती पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते. मुळांवर मोहरीच्या दाण्यासारखे बुरशीचे कण तयार होतात. झाडाची वाढ खुंटते, ते कोमेजते आणि शेवटी सडून मरते..दोन्ही रोगांवर एकच प्रभावी उपायमुळकुज आणि खोडकुज या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर प्रभावी ठरतो. रोगाची लक्षणे दिसलेल्या भागात ५ ते १० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति लिटर पाणी या प्रमाणात झाडाच्या बुंध्याजवळ आळवणी करावी. जमिनीत पुरेसा ओलावा असताना हा उपाय केल्यास अधिक चांगला परिणाम मिळतो..BBF Technique: बीबीएफ तंंत्राने ५० एकरांवर सोयाबीन पेरणी.ट्रायकोडर्मा पाण्यातून न देता शेणखतात मिसळूनही देता येतो. यासाठी प्रति हेक्टर सुमारे २० किलो ट्रायकोडर्मा वापरण्याची शिफारस नारायणगाव येथील कृषि विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी दिली आहे..प्रादुर्भाव जास्त असल्यासरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी हे बुरशीनाशक १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात झाडाच्या बुंध्याजवळ आळवणी करावी. यामुळे रोगाचा पुढील प्रसार कमी होण्यास मदत होते..सोयाबीनची फेरपालट महत्त्वाचीरोगांच्या बुरशीचे बीजाणू ५ ते ७ वर्षे जमिनीत जिवंत राहू शकतात. त्यामुळे एकाच शेतात वर्षानुवर्षे सतत सोयाबीन घेणे टाळावे. पिकांची फेरपालट केल्यास जमिनीतील रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते, असा सल्ला अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्रामधील अखिल भारतीये सोयाबीन संशोधन प्रकल्पातील तज्ज्ञ राजीव घावडे यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.