Soil Fertility: शेतीमध्ये पिकाला खत देणे फार महत्त्वाचे असते. आजकाल रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. शिवाय रासायनिक खतांच्या वापरामुळे खर्चातही वाढ होते. त्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केल्यास शेतकरी कमी खर्चात पिकाला खतांचा पुरवठा करु शकतात आणि जमिनीचे आरोग्य सुधारु शकतात. यासाठी जीवामृत हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो..Compost Making: अतिवृष्टीनंतर रब्बी पेरणीसाठी घरच्या घरी करा कंपोस्ट खत तयार .जीवामृत हे असे सेंद्रिय खत आहे जे शेतकरी घरच्या घरी तयार करु शकतात. जीवामृताचे मातीसाठी फार उपयुक्त असते. हे खत मातीला आवश्यक पोषकतत्त्वे पुरवते त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात त्यामुळे पिकांची वाढ सुधारते आणि उत्पादनही वाढते..जीवामृताचे फायदेजीवामृतामुळे शेतातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होण्यास मदत होते. त्याचा माती आणि सूक्ष्मजीवांसाठी फायदा होतो. जीवामृताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे तिच्यामध्ये विविध सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. तसेच जीवामृत हे त्यांच्यासाठी चांगला अन्नस्त्रोत आहे. .पिकांना आवश्यक असलेले नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य पोषक तत्त्वांचा जीवामृतामुळे पुरवठा होतो. त्यामुळे पिकांची वाढ सुधारते आणि परिणामी उत्पादनात वाढ होते. जीवामृत हे एक सेंद्रिय खत असून अगदी कमी साहित्यामध्ये त्याची निर्मिती करता येते. तसेच जीवामृत वापरण्यासाठी कोणत्या अटी नाहीत. ते सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरले जाऊ शकते..जीवामृत तयार करण्याची पद्धतजीवामृत तयार करताना २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या बॅरल किंवा टाकीत साधारणत: १७० लिटर स्वच्छ पाणी घ्यावे. त्यात १० किलो गाय किंवा बैलाचे शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो काळा गूळ, २ किलो बेसन आणि २ किलो जिवाणूयुक्त म्हणजेच बनातील माती किंवा १०० ग्रॅम उपलब्ध संवर्धक म्हणजे प्रिजर्व्हेटीव्हज् मिसळावे. हे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळा, प्रत्येक वेळी १० ते १५ मिनिटे डावीकडून उजवीकडे ढवळावे. साधारण ७ दिवसांत हे द्रावण पिकांना देण्यासाठी तयार होते. .एका एकरासाठी २०० लिटर जीवामृत पुरेसे ठरते. शेत जास्त असल्यास बॅरलची संख्या वाढवावी किंवा हजार लिटर क्षमतेच्या टाकीत वरील प्रमाण पाचपट करून मोठ्या प्रमाणात द्रावण तयार करावे. गोमूत्र अधिक प्रमाणात उपलब्ध असल्यास पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवावे. चांगल्या प्रतीचे जीवामृत साधारणपणे तांबूस ते काळसर रंगाचे दिसते. यात नत्राचे प्रमाण साधारण ३ ते ६ टक्क्यांपर्यंत असते. जीवामृताचा सामू किंचित आम्लधर्मी म्हणजे ७ पेक्षा थोडासा कमी असतो, त्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या विविध प्रजातींच्या वाढीसाठी हे उत्तम अन्नस्त्रोत म्हणून कार्य करते.या द्रावणातील सूक्ष्मजीव हवेतील नत्र शोषून घेतात आणि त्याच वेळी कर्ब-नत्राचे प्रमाण संतुलित ठेवतात. जीवामृत द्रवरूप असल्यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या अधिक राहते आणि त्यांचे आयुष्य वाढते. मात्र, हे द्रावण ३० दिवसांच्या आत वापरणे आवश्यक असते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.