Rabi Season: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतातील माती वाहून गेली. या मातीसोबत मातीमधील अन्नद्रव्ये-पोषकतत्त्वेसुद्धा वाहून गेली आहे. आता रब्बीचा हंगाम सुरु होतोय, रब्बीच्या पिकासाठी चांगली व पोषक माती असण्याची गरज आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा झाल्यावर मातीचे परीक्षण केल्यास शेतकरी रब्बी पिकासाठी जमिनीतील अन्नद्रव्यांचे नियोजन करु शकतात. .मातीचे परीक्षण ही फार सोपी, महत्त्वाची आणि उपयोगी प्रक्रिया आहे. माती परीक्षण म्हणजे मातीचा नमुना घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी करणे. हा नमुना घेताना जमिनीचा उतार, रंग, खोली, पोत याचा सर्वसाधारण विचार करुन शेतातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे नमुने घ्यावेत. किंवा जमीन एकसारखी असल्यास एक हेक्टर क्षेत्रासाठी एक नमुना पुरेसा आहे. .Soil Health : मातीचे आरोग्य जपल्याचे मिळविले समाधान .नमुना कसा घ्यावाजमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा, दगड गोटे बाजूला करुन घ्यावे. नमुना घेण्यासाठी टिकाशीच्या साह्याने इंग्रजी 'V' आकाराचा खड्डा करावा आणि त्यातील सर्व माती बाहेर काढून टाकावी. खड्ड्याच्या एका बाजूने दोन ते तीन सें.मी. जाडीची माती लाकडी काठीच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून घमेल्यात काढून घ्यावी. घमेल्यात ही माती व्यवस्थित मिसळून घ्यावी. .ती स्वच्छ करुन घ्यावी. ती स्वच्छ गोणपटावर पसरुन त्याचा ढिग करावा. या ढिगाचे चार समान भाग करून त्यातील समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत. उर्वरित दोन भाग पु्न्हा एकत्र करुन पुन्हा त्याचे चार भाग करावेत. त्यातील समोरासमोरील दोन भाग काढून टाकावे. ही क्रिया साधारणत: अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत करावे. नमुन्यासाठी घेतलेली माती ओली असल्यास ती सावलीत वाळवून घ्यावी आणि स्वच्छ कापडी पिशवीत भरून प्रयोगशाळेत पाठवावी..या कापडी पिशवीवर आणि आतमध्ये चिठ्ठीवर पुढील माहिती लिहून द्यावी. १. शेतकऱ्याचे नाव, पत्ता व संपर्क क्र.२. नमुना घेण्याची तारीख३. सर्वे नं. / गट नं.४. शेतीचा प्रकार- बागायती की कोरडवाहू५. ओलिताचे साधन६. जमीन बागायती की कोरडवाहू, ७. मागील हंगामात घेतलेल्या पिकाचे नाव,८. येत्या हंगामात घेऊ इच्छिणाऱ्या पिकाचे नाव.हा नमुना आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या, कृषी विज्ञान केंद्राच्या किंवा खासगी माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा..माती परीक्षणाचा नमुना घ्यावयाची काळजी शेतात जनावरे बसण्याच्या जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, विहिरींचे किंवा शेतीचे बांध, दलदलीची जागा, झाडाखालची जागा, उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊ नयेत. वेगवेगळे नमुने एकत्र करु नयेत. मातीचा नमुना घेण्यासाठी खताच्या पिशव्या वापरू नये. मातीचा नमुना काढणीनंतर आणि पेरणीपू्र्वी घ्यावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.