ठळक मुद्देलाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता e-KYC बंधनकारकदोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया करावी लागणारया योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया करावी लागणार आहे. दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया करण्यास राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. सर्व लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी. ही प्रक्रिया आपल्या सर्वांच्या हितासाठीच आहे, यामुळे लाडक्या बहिणींच्या सन्मान निधी वितरणात सुलभता आणि सुसूत्रता येईल, असे माहिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.. ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी? याबाबत तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत सविस्तर माहिती दिली आहे.मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर फॉर्म उघडेल.या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने त्याचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओटीपी (Send OTP) या बटणावर क्लिक करायला हवे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे. .Ladki Bahin : ‘लाडकी बहीण’मुळे वित्तीय तूट नाही .यानंतर प्रणाली तपासेल की सदर लाभार्थ्याची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “ई- केवायसी आधीच पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल..यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड नमूद करावा. संमती दर्शवून सेंड ओटीपीवर क्लिक करावे. ओटीपी संबंधित मोबाईलवर आल्यावर तो नमूद करून सबमिट बटणावर क्लिक करावे.त्यानंतर लाभार्थ्याला त्याचा जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील, त्या पुढीलप्रमाणे :१. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार अथवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत अथवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.२. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिट बटण दाबावे.शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल. .Ladki Bahin Yojana : विभक्त रेशनकार्डधारक सुना ‘लाडकी बहीण’साठी पात्र.या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.