Winter Crops: महाराष्ट्रात रब्बी हंगामात प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांत विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. भाजीपाला पिकांची व्यापारी स्तरावर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यांना थंड हवामान मानवते, त्यामुळे रब्बी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरते. यामध्ये योग्य जमिनीची निवड, लागवडीपूर्वीची तयारी, खत आणि पाणी व्यवस्थापन या गोष्टींचे नियोजन केल्यास कमी क्षेत्रात अधिक उत्पादन व आर्थिक फायदा मिळतो. .रब्बी हंगामात विविध भाजीपाला वर्गातील पिके घेता येतात. जसे फळवर्गीय भाजीपालामध्ये टोमॅटो, शेंगवर्गीय भाजीपाल्यात चवळी, घेवडा, वाटाणा तर मुळ वर्गीय भाजीपाल्यात गाजर, मुळा, बीट रुट, कोबीवर्गीय भाजीपाल्यात कोबी, फुलकोबी, ब्रोकोली. कंदवर्गीय भाजीपाल्यामध्ये कांदा व लसूण आणि पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, चाकवत, लेट्यूस या भाज्यांचा समावेश होतो. रब्बी हंगामातील सर्व भाजीपाला पिकांपैकी कोणतेही एक किंवा दोन पीक निवडावे आणि शास्त्रशुद्ध तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून लागवड करावी. .Fruit Vegetable Packaging : सक्रिय पॅकेजिंग : फळे आणि भाज्या टिकविण्याचा नवा मार्ग .हवामानकांदा, लसूण, गाजर, मुळा, बीटरूट, वाटाणा, टोमॅटो, कोबी, फुलकोबी, ब्रोकोली, घेवडा ही पिके प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतली जातात. या पिकांना थंड आणि समशीतोष्ण हवामान सुरुवातीच्या काळात अधिक अनुकूल असते. तर उष्ण आणि कोरड्या हवामानाचा या पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.तसेच जास्त थंड हवामान, दव किंवा धुके पडल्यास पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, परिणामी उत्पादनात घट येते. मात्र कांदा आणि लसूण पिकांना गड्डे पोसण्यासाठी थोडे उष्ण हवामान आवश्यक असते. उष्ण हवामान वाटाण्याच्या वाढीवर आणि बियांच्या चवीवर परिणाम करते. म्हणून सर्वसाधारणपणे थंड आणि समशीतोष्ण हवामानात कांदा व लसूण भाजीपाला पिकांची लागवड फायदेशीर ठरते..जमीनया सर्व भाजीपाला पिकांना मध्यम, कसदार तसेच भारी जमीन मानवते. लागवडीसाठी भुसभुशीत, सुपिक आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. चिकणमातीच्या जमिनीत पिकांची वाढ चांगली होत नाही आणि कांदा-लसूण पिकांचे गड्डे नीट पोसत नाहीत. आम्लयुक्त म्हणजेच कमी सामू असलेल्या जमिनीत कोबी व फुलकोबी पिकांची लागवड टाळावी. जमिनीचा सामू साधारणतः ६ ते ८ दरम्यान असावा. तसेच क्षारयुक्त जमिनी या पिकांच्या लागवडीसाठी निवडू नयेत..लागवडीपूर्व तयारीभाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करावी. त्यानंतर प्रति हेक्टर २० टन शेणखत टाकून जमिनीत मिसळावे आणि कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात घेतलेल्या पिकांचे अवशेष वेचून गोळा करावेत.लागवडीच्या पद्धतीनुसार सपाट वाफे, सरी-वरंबे किंवा रुंद गादी वाफे तयार करावेत आणि त्यानंतर पिकांची लागवड करावी..कृषी सल्ला (रब्बी पिके, हळद, केळी, भाजीपाला, चारा पिके).लागवड पद्धतीकांदा पिकांच्या रोपांची लागवड करण्यापूर्वी त्यांची मुळे बुरशीनाशकात जसे की कार्बेन्डाझीम १ ग्रॅम अधिक डायमेथोएट १.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळलेल्या या द्रावणात १५ मिनिटे बुडवावीत.टोमॅटो, कोबी, फुलकोबी आणि ब्रोकोलीची लागवड सरी-वरंब्यांवर करावी. कांदा व लसूण पिकांची लागवड सपाट वाफ्यावर किंवा रुंद गादी वाफ्यावर करावी.वाटाणा पिकाची लागवड सरी-वरंब्यावर किंवा सपाट वाफ्यावर करता येते, परंतु सरी-वरंब्यावर लागवड अधिक फायदेशीर ठरते. घेवडा पिकाची लागवड दोन्ही पद्धतींनी केली जाऊ शकते. वाटाणा, घेवडा आणि लसूण या पिकांची लागवड प्रत्यक्ष बी किंवा पाकळ्या टाकून करावी..पाणी व्यवस्थापनरब्बी हंगामातील भाजीपाला पिकांना वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा करणे अत्यावश्यक आहे. ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे तर फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान ५ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.तसेच पाणी हे जमिनीच्या प्रकारानुसार द्यावे. कमी पाणी दिल्यास फळे किंवा शेंगा नीट पोसत नाहीत, तर जास्त पाणी दिल्यास मुळकुज किंवा मर रोग वाढतो. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन करावे.सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा, ज्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते. फुले येण्याच्या आणि फळे पोसण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये; अन्यथा फुलगळ होऊन उत्पादनात घट येते..खत व्यवस्थापनभाजीपाला पिकांच्या यशस्वी उत्पादनासाठी खतांचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा करावा. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा आणि आवश्यक प्रमाणात रासायनिक खते द्यावीत.सर्वसाधारणपणे, निम्मे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे; उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी द्यावे..वाटाणा आणि घेवडा ही व्दिदलवर्गीय पिके असल्यामुळे त्यांना नत्र खतांची आवश्यकता कमी असते. पाण्यात विरघळणारी खते जसे १५:१५:१५, २०:२०:२०, ०:५२:३४, ०:०:५० ठिबक पद्धतीने किंवा फवारणीद्वारे देता येतात.पिकांना प्रमुख अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही आवश्यकता असते. त्यामुळे जस्त, लोह, मॅग्नीज यांची गरजेनुसार फवारणी करावी.उभ्या पिकांवर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास फुला द्रवरूप सूक्ष्म ग्रेड क्र. २ या द्रावणाची पहिली फवारणी शाकीय वाढीच्या अवस्थेत ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात आणि दुसरी फुलोऱ्यात १०० मिली प्रती १० लिटर पाण्यात करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.