Crop Care in Heavy Rain: राज्यात बहुतांश भागात नुकतीच पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाने उघडीप दिलेली असून सध्या पावसाचा खंड पडण्याची शक्यता केली जात आहे. अशा परिस्थितीत कपाशी पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीच्या रोपांची नियमित पाहणी करून रोगाची लक्षणे दिसताच तातडीने उपाययोजना कराव्यात..मुळकुजची शक्यताकपाशीमध्ये रायझोक्टोनिया सोलॅनी, मॅक्रोफोमिना फॅसिओलिना (रायझोक्टोनिया बटाटीकोला) आणि स्क्लेरोशियम रॉल्फसी या बुरशींमुळे मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाऊसानंतर अचानक उष्ण आणि कोरडे वातावरण निर्माण झाल्यास या बुरशींची वाढ वेगाने होते..Soybean Diseases: अतिवृष्टीनंतर सोयाबीनमध्ये मुळकुज, बांधाकुज रोगाचा धोका; वेळीच करा उपाययोजना.रोगाची लक्षणे कशी ओळखाल?रोगाच्या सुरुवातीला रोपे शेंड्याकडून कोमेजू लागतात आणि खाली झुकतात. मुळे आणि जमिनीलगतचा बुंधा सडल्यामुळे झाड सहज उपटले जाते.रायझोक्टोनिया बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास मुळे तांबूस किंवा काळसर दिसू लागतात आणि कुजतात. तर स्क्लेरोशियम रॉल्फसी या बुरशीमुळे खोडाच्या बुंध्याजवळ पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते. त्या ठिकाणी मोहरीच्या दाण्यांसारखे तपकिरी बुरशीचे कण तयार होतात..अलीकडच्या काळात मॅक्रोफोमिना फॅसिओलिना या बुरशीचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. या रोगामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने व खोड लालसर दिसू लागते आणि मुळे सडून झाड वाळते. पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांच्या काळात या बुरशीच्या संसर्गामुळे काही वेळा पानांवर करपा रोगासारखे डागही दिसू शकतात..Cotton Herbicide: कपाशीमध्ये उगवणपूर्व आणि उगवणपश्चात तणनाशक कोणते फवारावे?.लक्षणे दिसल्यास..तुमच्या शेतात कपाशीच्या रोपांवर अशी लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडं लगेच उपटून शेताबाहेर नष्ट करावीत. तसेच कमी प्रादुर्भाव असलेल्या रोगग्रस्त झाडांसह आजूबाजूच्या झाडांच्या बुंध्याजवळ ट्रायकोडर्मा (ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी) ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी..प्रादुर्भाव जास्त असल्यास कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी १२ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. ठिबक सिंचनाची सुविधा असल्यास हे द्रावण मुळाभोवती ठिबकद्वारेही देता येते, असा सल्ला केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. शैलेश गावंडे यांनी दिला आहे..पुढील हंगामासाठी काळजी घ्यामूळकुज टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यावर शिफारशीनुसार बुरशीनाशक आणि ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच कपाशीचे अवशेष शेतात न ठेवता त्यांची योग्य विल्हेवाट लावल्यास जमिनीतील बुरशीचे प्रमाण कमी होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.