Orange Mosambi Fruit Drop: यंदा आंबिया बहरातील संत्रा आणि मोसंबी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ होताना दिसते आहे. फळगळच्या कारणांपैकी कीड व बुरशीजन्य रोग हेही एक मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे वेळेवर योग्य व्यवस्थापन करणे, योग्य नियोजन करुन फवारण्या करणे अत्यंत गरजेचे आहे..विशेषतः आंबिया बहारातील फळांवर ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत रस शोषण करणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच फायटोप्थोरा, कोलेटोट्रायकम आणि अल्टरनेरिया यांसारख्या बुरशीजन्य रोगांमुळेही फळे गळतात..Orange Fruit Drop: आंबिया बहारातील संत्रा मोसंबी फळगळवर उपाय.रस शोषणाऱ्या पतंगामुळे फळगळआंबिया बहारातील फळांवर रस शोषण करणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.या किडीमुळे गळालेली फळे दाबून पाहिल्यास त्यावर छिद्र दिसते आणि त्यातून रस बाहेर येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी बागेच्या परिसरातील गुळवेल, वासनवेल आणि चांदवेल यांसारख्या तणांचा नाश करावा. रात्री बागेत धूर केल्यासही पतंगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते..पतंग प्रकाशाकडे आकर्षित होत असल्यामुळे गुळाचे पाणी, संत्र्याचा रस आणि आंतरप्रवाही कीटकनाशक यांचे द्रावण तयार करून पसरट भांड्यात भरावे आणि ते झाडावर टांगावे. त्यामुळे पतंगांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ टक्के (५०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा नीम तेल १०० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी..Mosambi Farming: आंबिया बहरातील मोसंबी फळगळ कमी करण्यासाठी उपाय.बुरशीजन्य रोगांमुळेही फळगळफायटोप्थोरा, कोलेटोट्रायकम आणि अल्टरनेरिया या बुरशींमुळेही फळगळ होते. अल्टरनेरिया बुरशीची लागण फुलांच्या बिजांडावर होते. नंतर फळ काढणीच्या अवस्थेत फळे गळू लागतात. अशी फळे कापल्यास फोडीजवळ काळा पट्टा दिसतो.काही वेळा बुरशीची लागण फळाच्या साली व देठाच्या जोडावर होते. त्यामुळे तपकिरी डाग पडतात, तो भाग कुजतो आणि फळगळ होते. अशा वेळी कॅप्टन ७५ टक्के डब्ल्यू. पी. २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी..आंबिया बहारातील फळगळ कमी करण्यासाठी तीन फवारण्यासंत्रा पिकामध्ये आंबिया बहारातील फळगळ कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी २ फवारण्यांची शिफारस केलेली आहे. यामध्ये १ किलो पोटॅशियम नायट्रेट, अझोक्सोस्ट्रोबिन १८.२ टक्के अधिक डायफेनकोनाझोल ११.४ टक्के हे पूर्वमिश्रित बुरशीनाशक १०० मिली आणि १ ग्रॅम जिब्रेलिक अॅसिड याची फवारणी करावी किंवा १ किलो पोटॅशियम नायट्रेट टेब्यूकोनाझोल ५० टक्के अधिक ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन २५ टक्के डब्ल्यूजी हे ५० ग्रॅम आणि १ ग्रॅम जिब्रेलिक अॅसिड याची फवारणी करावी. वरील मिश्रण १०० लिटर पाण्यात मिसळून एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत अशा तीन फवारण्या कराव्यात..तेलकट डाग रोगाचे व्यवस्थापननागपूर संत्रा पिकावरील तेलकट डाग रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायो-डीकॉम्पोझार १ किलो प्रति झाड शेणखतामध्ये मिसळून द्यावे. तसेच संरक्षणात्मक उपाय म्हणून हॉर्टिकल्चरल मिनरल ऑइल २ टक्के म्हणजेच २०० मिली प्रति १० लिटर पाणी याची फवारणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करावी. यानंतर नोव्हेंबरमध्ये हेक्साकोनाझोल ४ टक्के अधिक झायनेब ६८ टक्के डब्ल्यूपी १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.वेळेवर कीड व रोगांचे निरीक्षण करून शिफारशीनुसार उपाय केल्यास संत्रा आणि मोसंबीतील फळगळ मोठ्या प्रमाणात कमी करता येते आणि उत्पादनाचे नुकसान टाळता येते. असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. सुरेंद्र रा. पाटील, डॉ. देवानंद मो. पंचभाई, वृषाली द. चौघले यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.