Mava Kid Control: रब्बी ज्वारीचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. यंदा ज्वारीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीपासून दिसत आहे. ही कीड पिकातील रस शोषून घेते आणि पिकाचे मोठे नुकसान करते; यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक किंवा जैविक उपाययोजना करणे आवश्यक असते. .मावा कीडहा एक लहान, मऊ कीटक आहे जो पानांच्या खालच्या बाजूला आणि कोवळ्या शेंड्यांवर चिकटतो आणि रस शोषण करतो. हे कीटक ज्वारी, मका, बाजरी, करडई आणि राळा पिकांवर आढळतात. या किडीची पिल्लावस्था चार टप्प्यात पूर्ण होते. तर प्रौढांमध्ये पंखरहित आणि पंखधारित असे दोन प्रकार पडतात. एका पिढीचा संपूर्ण जीवनचक्र साधारणतः दोन आठवड्यांत पूर्ण होतो. या लेखासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईट यांनी मार्गदर्शन केले आहे. .Rabi Jowar Pest : रब्बी ज्वारीवर ‘लष्करी’, तर हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव.नुकसानीचे स्वरूपमावा किडीची पिल्ले आणि प्रौढ मध्य पानांच्या घडीत जसं पोंग्यात, खोडावर आणि फुलोऱ्यावर समूहाने राहून रस शोषतात. ज्यामुळे पाने पिवळी पडतात, वाकडी होतात आणि वाढ मंदावते. ही कीड आपल्या विष्ठेद्वारे मधासारखा चिकट द्रव सोडते. ज्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने काळी दिसू लागतात. त्यामुळे अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि पिकाची वाढ खुंटते..प्रादुर्भावाची कारणेढगाळ आणि दमट हवामानामुळे माव्याचा प्रादुर्भाव होतो. तसेच पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन न केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामध्ये शेताची स्वच्छता न ठेवणे, तणांचं नियंत्रण न करणे, वेळोवेळी पिकाचे निरीक्षण न केल्याने मावा किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो..एकात्मिक कीड व्यवस्थापनमावा कीड प्रतिकारक वाणाची निवड पेरणीसाठी करावी.रब्बी ज्वारीमध्ये पहिली कोळपणी किंवा खुरपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी करावी. दुसरी कोळपणी किंवा खुरपणी पेरणीनंतर पाच आठवड्यांनी करावी तर तिसरी कोळपणी/खुरपणीनंतर आठ आठवड्यांनी करावी. आंतरमशागतीमुळे किडींचे चांगले नियंत्रण करता येते.मशागतीनंतर पूर्वीच्या पिकाची धसकटे, चिपाडे, बांधावरील गवत, तण काढून आणि वेचून एकत्र करून नष्ट करणे.शेत तणविरहीत ठेवा. नत्रयुक्त खताचा संतुलित वापर करावा. ढालकिडे, क्रायसोपा, सिरफिड माशी आदी मित्रकिटकांचे संवर्धन करावे. ज्वारीच्या पेरणीपूर्वी इतर यजमान पिकांची लागवड केली नव्हती याची खात्री करावी.ज्वारीमध्ये हेक्टरी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.रासायनिक फवारण्यांमध्ये क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी हे कीटकनाशक ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.तर डायमिथोएट ३० टक्के ईसी हे कीटकनाशक १२ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.फवारणी करताना कधीही पोंग्यामध्ये द्रावण पडेल अशी फवारणी करावी. तसेच डायमेथोएटची फवारणीसुद्धा फायदेशीर ठरते..रासायनिक कीडनाशकांची खबरदारीकेंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीच्या नोंदीनुसार, या किडीस कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची शिफारस नाही. त्यामुळे प्रादुर्भाव जास्त आढळल्यास अॅग्रेस्को शिफारशीच्या आधारे, तसेच मित्रकीडांची संख्या लक्षात घेऊन संबंधित तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच फवारणीचे नियोजन करावे. या किडीच्या नियंत्रणामध्ये मित्रकीटकांची महत्त्वाची भूमिका असल्याने, त्यांना हानी पोहोचवणाऱ्या कीटकनाशकांचा वापर टाळावा..डॉ. दिगंबर पटाईत, ७५८८०८२०४० सहाय्यक किटकशास्त्रज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.