Safe Jaggery Processing: गूळ हा नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ मानला जात असला, तरी त्याची निर्मिती प्रक्रिया सुरक्षित व स्वच्छ पद्धतीने झाली नाही तर तो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. गूळ तयार करताना जैविक, भौतिक आणि रासायनिक स्वरूपाचे विविध धोके निर्माण होऊ शकतात, जे उत्पादनाची गुणवत्ता तसेच ग्राहकांचे आरोग्य हे दोन्ही बाधित करू शकतात. त्यामुळे गूळ उत्पादन प्रक्रियेत येणाऱ्या संभाव्य धोक्यांची माहिती असणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे..१) जैविक धोकेस्वच्छतेचा अभाव: गुऱ्हाळ घर, भांडी, यंत्रे, मजूर यांची स्वच्छता नीट नसेल तर गुळात जंतू वाढतात. त्यामुळे गूळ खाणाऱ्यांना जुलाब, उलटी, ताप यांसारखे आजार होऊ शकतात.रोगकारक जंतूंचा प्रवेश: ऊसाचा रस, गाळणी किंवा साठवणीत जिवाणू, बुरशी व विषाणू मिसळू शकतात. यामुळे गूळ खराब होतो आणि आरोग्यास धोका निर्माण होतो..Jaggery Produciton: दर्जेदार गुळासाठी गुऱ्हाळघर व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या ५ टिप्स.कीटक व उंदरांचा प्रादुर्भाव: गूळ, रस किंवा साठवण जागी माशा, मुंग्या, झुरळे, उंदीर येतात. त्यांच्या विष्ठेमुळे गूळ दूषित होतो आणि खाण्यास अपायकारक ठरतो.कामगारांकडून आजार पसरणे: कामगारांनी हात धुतले नाहीत, नखे कापलेली नसतील किंवा ते आजारी असतील तर त्यांच्या हातातून जंतू गुळात जातात.पाण्याचे प्रदूषण: गूळ बनवताना वापरलेले पाणी स्वच्छ नसेल, नाल्यातले किंवा दूषित असेल तर त्यातील जंतू गुळात जातात व आजार होऊ शकतो..२) भौतिक धोकेअपघात व भाजणे: उकळणारे रसाचे कढई, भट्टी, यंत्रे यामुळे कामगारांना हात-पाय भाजण्याचा किंवा गंभीर जखम होण्याचा धोका असतो.धातूचे तुकडे किंवा घाण गुळात जाणे: यंत्रातून नट-बोल्ट, लोखंडाचे तुकडे, दगड, माती, काडी-कचरा चुकून गुळात मिसळू शकतो..यंत्रसामग्री बिघाड: क्रशर, मोटर, पंप, गाळणी नीट नसेल तर उत्पादन थांबते, गूळ खराब होतो आणि आर्थिक नुकसान होते. त्यामुळे यंत्रांची नियमित तपासणी गरजेची आहे.अतिउष्णतेचा धोका: गूळ उकळताना फार उष्णता असल्यामुळे भाजण्याचा, अंगावर गरम रस सांडण्याचा धोका असतो.गाळणीत अडकलेली घाण: गाळणी, ड्रम किंवा टाकीत राहिलेली माती, पानं, काडी गुळात जाऊ शकतात..Jaggery Production: उसापासून गूळ निर्मितीचे शास्त्रीय तंत्र.३) रासायनिक धोके (रसायनांमुळे होणारे धोके)धुण्यासाठी वापरलेल्या रसायनांचे अवशेष: भांडी, टाक्या धुण्यासाठी वापरलेले केमिकल नीट धुतले नाहीत तर त्याचे अंश गुळात राहतात.तापमान नीट नियंत्रित न केल्याने होणारे नुकसान: गूळ जास्त तापला तर जळतो, काळा पडतो आणि काही हानिकारक रसायने तयार होऊ शकतात.कृत्रिम रंग व रसायने वापरणे: गुळाला चांगला रंग, चकाकी किंवा टिकाऊपणा देण्यासाठी काही जण चुकीची रसायने वापरतात. ती आरोग्यास अत्यंत घातक असतात..स्निग्धता वाढवणारी रसायने: गूळ मऊ ठेवण्यासाठी किंवा चमक आणण्यासाठी वापरलेली रसायने शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात.कीटकनाशकांचे अवशेष: ऊस पिकावर फवारलेली कीटकनाशके रसात जाऊन शेवटी गुळात राहू शकतात.तापमान बदलामुळे रासायनिक प्रतिक्रिया: उकळताना अचानक जास्त किंवा कमी तापमान झाल्यास गुळात घातक रासायनिक बदल होऊ शकतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.