प्रा. डॉ. सुरेंद्र पाटील.Amba Mohor: आंब्याला मोहोर येण्याला आता सुरुवात झाली आहे. आंब्याच्या मोहोरावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव पहायला मिळतो. यामध्ये भुरी आणि तुडतुडे मोहोराचे नुकसान करतात. परंतु आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी वेळीच योग्य उपाययोजना केल्यास या किडींवर नियंत्रण मिळवता येते. तसेच मोहोराचे संरक्षण करण्यास मदत होते. .आंबा मोहोराचे संरक्षणमोहोर येण्याच्या १५ दिवस आधीपासून झाडावर फवारणी करण्यास सुरुवात करावी. यासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन हे कीडनाशक १० मि.ली. किंवा अॅझाडीरेक्टीन (१००० पीपीएम) हे कीडनाशक ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ही फवारणी करताना खोडावर, फांद्यांवर व पानांवर सर्वत्र पसरेल अशी फवारणी करावी..Mango Orchard Management: वाढीच्या अवस्थेत आंबा बागेचे व्यवस्थापन.दुसरी फवारणीपहिल्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी म्हणजे डोळे फुटताच खोड, फांद्या व झाडावर दुसरी फवारणी करावी. यामध्ये पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम अधिक थायमेथोकॉम (२५ डब्ल्यूपी) ३ ग्रॅम या संयुक्त कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे बुरशी रोग आणि तुडतुड्यांचे नियंत्रण होईल..तिसरी फवारणीतिसरी फवारणी साधारणत: दुसऱ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी करावी. पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझॉल ५ मि.ली. यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची अधिक इमिडॅक्लोप्रिड (१७.७ टक्के) ३ मि.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ३ मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. झाडावर मोहोर उमलण्याच्या काळात बुरशीनाशक फवारावे. मात्र कीडनाशक वापरणे टाळून कडुलिंब अर्काचा वापर करावा. कारण कीडनाशकाचा मधमाशांवर विपरीत परिणाम होऊ शकतो..चौथी फवारणीतिसऱ्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी चौथी फवारणी करावी. या फवारणीत पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझॉल ५ मि.ली. यापैकी एक बुरशीनाशक अधिक इमॅडाक्लोप्रिड (१७.७ टक्के) ३ मि.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन १५ मि.ली. कीडनाशक प्रमाण प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. केशर आंबा बागेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक हानिकारक असून, तुडतुडे तुलनेने कमी असतात. त्यामुळे केशर आंबा उत्पादकांचा मुख्य भर हा भुरी रोगाच्या नियंत्रणावर असावा त्यासाठी ही फवारणी उपयुक्त ठरते..पाचवी फवारणीचौथ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी गरज असल्यास पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझॉल ५ मि.ली. यापैकी एक बुरशीनाशक अधिक बुप्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २० मि.ली. किंवा थायामिथोक्झाम (२५ डब्ल्यू पी) ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..सहावी फवारणीगरज भासल्यास पाचव्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी सहावी फवारणी करावी. पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझॉल ५ मि.ली. यापैकी एक बुरशीनाशक अधिक डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के इसी) ५ मि.ली. हे प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.प्रत्येक फवारणीमध्ये शक्यतो तेच ते बुरशीनाशक किंवा कीडनाशक घेण्याच्या ऐवजी प्रत्येक वेळी बदलत जावे. मध्येच एखाद्या वेळेस ढगाळ वातावरण असले किंवा पाऊस पडला तर एखादी फवारणी जास्तीची घ्यावी.डॉ.सुरेंद्र रा. पाटील, फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.