Solapur News: महावितरणकडून घरगुती ग्राहकांना वीज वापराच्या वेळेनुसार (Time of Day-TOD) सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळू लागला आहे. १ जुलै २०२५ पासून लागू झालेल्या टीओडी सवलतीमुळे बारामती परिमंडळातील टीओडी मीटर बसवलेल्या ४ लाख ४९ हजार २६८ घरगुती ग्राहकांना ७२ लाख ९२ हजार ७१८ युनिट वीज वापरावर एकूण ५८ लाख ३४ हजारांची सवलत मिळाली..विद्युत नियामक आयोगाने १ जुलैपासून घरगुती ग्राहकांसाठी प्रथमच टीओडी सवलत जाहीर केली. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट ८० पैसे सवलत दिली जात आहे..Electricity Bill Dues: ग्रामपंचायतींच्या वीजबिल थकबाकीची अडचण कायम .ती मार्च २०२६ पर्यंत लागू असून, पुढील पाच वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी २०२६-२७ मध्ये ८५ पैसे प्रतियुनिट, २०२७-२९ मध्ये ९० पैसे, २०२९-३० मध्ये १ रुपया याप्रमाणे या सवलतीतील युनिट वाढणार आहेत..Electricity Bill Issue: वीज बिलातील वाढीव दरांविरोधात शिवसेनेचे संभाजीनगर मुख्य अभियंत्यांना निवेदन.सोलापूरला सर्वाधिक ३१ लाखांची सवलतबारामती परिमंडळात साधारण ७५,०५९ ग्राहकांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या १२,४१,६८४ युनिट विजेवर ९.९३ लाखांची सवलत मिळवली..सातारा मंडळात १,५५,८९६ ग्राहकांनी वापरलेल्या २१,७५,५९९ युनिटसाठी १७.४० लाखांची सवलत घेतली. तर सोलापूर मंडळात २,१८,३१३ ग्राहकांना ३८,७५,४३५ युनिट वापरावरून ३१ लाखांची सवलत मिळाली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.