Ahmednagar News: नव्याने नोकरीत रुजू होणारे अधिकारी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेणारे सामाजिक कार्यकर्ते यांची जडणघडण हिवरेबाजारमुळे होते. हिवरेबाजार हे आपल्यासाठी ग्रामविकासाचे तीर्थक्षेत्र आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले..आदर्शगाव हिवरेबाजार (ता. अहिल्यानगर) येथे जलसाक्षरता केंद्र यशदा, पुणे व यशवंत कृषी, ग्राम व पाणलोट विकास संस्था तथा विस्तार प्रशिक्षण केंद्र हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील जलप्रेमी, जलदूत व जलकर्मींसाठी आयोजित पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळा झाली. भंडारी यांच्यासह आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, यशदाचे महासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, रमाकांत कुलकर्णी, सत्र समन्वयक सुखदेव फुलारी यांची उपस्थिती होती..Village Development Success : कृषीसह ग्रामविकासात दरी गावाने उभारले वैभव.आनंद भंडारी म्हणाले, जल साक्षरता असो किंवा कोणतेही योजना असेल, ती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पाझरली पाहिजे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमध्ये कुटुंबातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचता येईल, याचे आम्ही नियोजन करत आहोत..Village Development: ग्रामविकासाचा दीर्घकालीन आराखडा मांडताना....जलसाक्षरता, घनकचरा किंवा सांडपाणी व्यवस्थापन वा कोणतीही थीम असू दे, त्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांना सहभागी करून घेण्यात आपण कमी पडत आहोत. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत बऱ्यापैकी जनजागृती आहे,परंतु तरीही कळते पण वळत नाही अशी परिस्थिती असल्याने पाणी जाईपर्यंत कोणीही नळाची तोटी बंद करत नाही. .अहिल्यानगर जिल्ह्यात जलसाक्षरतेची खूप चांगली चळवळ सुरू आहे. या चळवळीत आवड असलेले आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास असणारी माणसे आहेत. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीकडून शंभरीकडे जात असताना पुढील २५ वर्षांत जे द्यायचे आहे ते देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समिती, महाराष्ट्र.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.