Ahilyanagar News : लोकसहभागातून आदर्श निर्माण करत नावलौकिक मिळवणाऱ्या आदर्श गाव हिवरे बाजार (ता. अहिल्यानगर) गावाने यंदा सलग २१ व्या वर्षी उपलब्ध पाण्याचा ताळेबंद जाहीर केला. यंदा शिवारांत एकूण २४ दिवस झालेल्या पावसांमुळे ५११.८६ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. सर्व वापरातून यंदा २.६८ कोटी लिटर पाणी शिल्लक राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे..आदर्श गाव हिवरेबाजार शिवारात फारसा पाऊस पडत नाही. कोरडवाहू पट्टा असलेल्या या भागात पावसातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करून वापर केला जातो. त्यासाठी आदर्श गाव योजना, प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रातील सातव्या माळेला उपलब्ध पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेतून सादर केला जातो. .Water Storage : नळगंगा धरण प्रकल्पात ६९ टक्के पाणीसाठा .यंदाचा पाणी ताळेबंद सोमवारी (ता. २९) सादर करण्यात आला. श्री. पवार, सरपंच विमल ठाणगे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन छबूराव ठाणगे, सेवा सोसायटीचे चेअरमन रामभाऊ चत्तर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत २४ दिवसांत ५२४ मिलिमीटर पाऊस झाला..यातून ५११.८६ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. यशदा (पुणे) येथे जागतिक नदी दिनानिमित्त आयोजित ‘नदीसाठी युवा शक्ती’ या कार्यक्रमात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, यशदा महासंचालक सुधांशु कुमार, उपमहासंचालक डॉ. शेखर गायकवाड, अतिरिक्त महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत पाण्याचा ताळेबंद प्रकाशित करण्यात आला..हिवरेबाजारच्या उपलब्ध पाण्याचा ताळेबंद (२०२५-२६)एकूण झालेला पाऊस ः ५२४ (मिलिमीटर) (२४ दिवस)पावसाद्वारे उपलब्ध झालेले एकूण पाणी ः ५११.८६ कोटी लिटर.Dam Water Storage : नाशिकमधील सर्व धरणे तुडुंब .उपलब्ध पाण्याचे वर्गीकरणबाष्प होऊन हवेत परत जाणारे पाणी ः १७९.१५ कोटी लिटरवाहून जाणारे पाणी ः ४०.९५ कोटी लिटरजमिनीत मुरणारे पाणी ः ८७.०२ कोटी लिटरमातीत मुरणारे पाणी ः १५६.५६ कोटी लिटरजमिनीवर साचणारे पाणी ः ५१.१९ कोटी लिटरजलसंधारण कामामुळे मुरणारे अधिकचे पाणी ः ५०.७८ कोटी लिटरगावाच्या वापरासाठी उपलब्ध पाणी (जमा) ः ३४२.५४ कोटी लिटरगावाच्या विविध वापरासाठी वार्षिक गरज (खर्च) ः ३३९.८६ कोटी लिटर.१९९५ पासून हिवरे बाजार येथे पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसविल्याने ताळेबंद अधिक अचूक तयार होऊ लागला.- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना, प्रकल्प व संकल्प समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.