Ahilyanagar News: सिंचन क्षेत्रातील भरीव कामाबद्दल आदर्श गाव हिवरेबाजार (ता. अहिल्यानगर) गावाचा पंचायतराज मंत्रालय भारत सरकारच्या जलसमृद्ध गाव पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. .अहिल्यानगर येथे आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सरपंच विमल ठाणगे, सोसायटीचे अध्यक्ष छबूराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, एस. टी. पादीर, बाबासाहेब गुंजाळ, सहदेव पवार, राजू पवार, श्रीपत फलके आदींसह ग्रामस्थांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले..Water-Rich Village Plan : जलसमृद्ध गाव आराखडा कसा करावा?.पंचायतराज मंत्रालय भारत सरकारच्या वतीने शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण कार्यक्रमात पंचायत विकास निर्देशांक व राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२२-२३ आधारित जिल्हास्तर जलसमृद्ध गाव पुरस्काराचे वितरण करण्यात आले..जलसिचंनात भरीव काम करताना हिवरे बाजारने पाण्याचा ताळेबंदावर आधारित पीक पद्धती अवलंब, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविला..Water-Rich Village : जलसमृद्ध गाव आराखडा कसा करावा?.पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास यांसारख्या क्षेत्रांत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्याचे उद्दिष्ट साध्य करणाऱ्या आदर्श गाव हिवरे बाजारला प्रथम पुरस्कार मिळाला..राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे..या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. डॉ. पवार, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार विक्रम पाचपुते, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.