Satara News : जिल्हास्तरीय सचिवांना जिल्हा देखरेख सहकारी संस्थेत समाविष्ट करून घेण्याचा शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे सचिवांना नोकरीची शाश्वती मिळणार आहे. आयुक्त कार्यालयाने अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर सर्वात प्रथम सातारा जिल्हा बँकेने याची अंमलबजावणी करत राज्यात अग्रेसर राहिली आहे, असे गौरवोद्गार सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी काढले..जिल्हा बॅंकेने ५८७ जिल्हास्तरीय सचिवांना जिल्हा देखरेख सहकारी संस्थेत समाविष्ट करून घेतले आहे. त्यापैकी प्रातिनिधिक ११ जिल्हास्तरीय सचिवांना सहकार आयुक्त श्री. तावरे यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. .Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेचा तब्बल १२५ कोटींचा निव्वळ नफा, एनपीए शून्यावर!.या वेळी बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, सत्यजित पाटणकर, प्रदीप विधाते, सुनील खत्री, रामभाऊ लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालक कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे, सहायक निबंधक, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम, सचिव संघटनेचे पदाधिकारी हनुमान घाडगे उपस्थित होते..श्री. तावरे म्हणाले, ‘‘सोसायटी संगणकीकरणाचे कामकाज राज्यात उत्कृष्ट झाले आहे. सर्व सचिवांनी केंद्र शासनाचे संगणकीकरण कामकाज अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे. सर्व संस्थांमध्ये कामकाजात एकसूत्रता व पारदर्शकता येणारा आहे. संस्था सक्षमीकरणाचे निधी, बँकेचे व्याज परतावा लवकरच दिले जातील.’’.Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत.खासदार पाटील म्हणाले, ‘‘विकास सेवा संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर नवीन येणाऱ्या पंच कमिटी त्यांच्या मर्जीतील सचिवांची नियुक्ती करत असल्याने सचिवांना नोकरीची शास्वती मिळत नव्हती; पण या नव्या निर्णयामुळे सचिवांना नोकरीची हमी मिळणार आहे. निकषामुळे ज्या सचिवांचा या प्रक्रियेत समावेश झालेला नाही, त्यांचाही समावेश करून घेण्यासाठी सहकार खात्याकडून परवानगी मिळावी.’’.डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक आदर्श संस्था असून, सातारा जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. २०२४-२५ अखेर उच्चांकी ढोबळ नफा २३३ कोटी आणि निव्वळ नफा रुपये १२५ कोटी झाला आहे.’’ या वेळी सचिव संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन अनपट यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.