Kolhapur News: दोन दशकांत हिरण्यकेशी नदीपात्र पहिल्यांदा कोरडे पडण्याची वेळ यंदा आली आहे. ठिकठिकाणी नदीपात्रातील वाळू दिसू लागली आहे. नदीपात्रात सुरू असलेल्या कामांमुळे ही स्थिती उद्भवली असली, तरी जलसंपदा विभागाचा पाणी नियोजनातील गोंधळ यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. पात्रात पाणी नसल्याने ऊस लागणी रखडल्या असून, शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे चित्री किंवा आंबेओहोळ प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी होत आहे..हिरण्यकेशी नदीवरील भडगाव येथे नव्या पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे. त्यासाठी जुना पूल पाडण्यात येणार आहे. गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नदीपात्रात पर्यायी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवाय विविध गावांच्या पाणी योजनांच्या इंटेक वेलचे काम सुरू आहे. .Hiranyakeshi River Pollution : हिरण्यकेशी नदी प्रदुषणाचा मुद्दा पेटला; १२ तरूणांचा जलसमाधिचा प्रयत्न, अनर्थ टळला.या कारणासाठी यंदा अजूनही प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सुरू केलेले नाही. उपलब्ध पाणी आतापर्यंत पुरले. वास्तविक या कामासाठीच पावसाचे पाणीसुद्धा यंदा काही बंधाऱ्यांमध्ये अडविले नाही; परंतु पाणीपातळी घटत असताना पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन करण्याची गरज होती; परंतु अजूनही त्याची कार्यवाही ठप्प असल्याचा परिणाम नदीपात्र कोरडी पडण्यावर झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे..Hiranyakeshi river pollution : कर्नाटकातील साखर कारखान्याची डोकेदुखी, महाराष्ट्रातील नदी झाली प्रदुषीत.दरम्यान, नदीपात्राची पाहणी करून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करायला हवे होते. भडगावला पर्यायी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तळामध्ये सिमेंट पाइपही घातले आहेत. त्यामुळे पाण्याचे आवर्तन सोडले असते तरीसुद्धा पाइपमधून पाण्याचा प्रवाह सुरू राहिला असता; परंतु पाटबंधारे विभागाचे पाण्याचे नियोजनच यंदा ढिसाळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. .चित्री’ अथवा ‘आंबेओहोळ’मधून तातडीने आवर्तन घेण्याची गरज असताना त्याची कार्यवाही अजूनही नाही. परिणामी नदीपात्र वीस वर्षांत पहिल्यांदा कोरडे पडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच वीज भारनियमनाने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या नवीन ऊस लागणीचे नियोजन बिघडले आहे. लागणीसाठी बांधावर ठेवलेले उसाचे बियाणे वाळत आहेत. वेळेत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.