Hingoli News: ‘कर्जमाफी म्हणजे भीक मागत नाही, तर कर्जमुक्ती मागत आहोत. सरकारने शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली नाही तर पाठीवर आसूडाचे फटके पडतील. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा महागात पडेल,’’ असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला..हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (ता.१२) क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आसूड मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत आहे..Protest For Onion Farmers: कांदा प्रश्नावर संसद परिसर दणाणला; विरोधी पक्षातील खासदारांची निदर्शने.श्री. तुपकर म्हणाले, की सोयाबीन, कपाशीला भाव मिळाला पाहिजे. सोयाबीनची आयात थांबवा. देशातील सोया डिओसी निर्यातीला परवानगी द्या. पीकविमा मिळाला नाही. वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतीसाठी कुंपण योजना सुरू करा..Ravikant Tupkar: रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलकांना सीमेवरच रोखले.पीकविमा योजना पूर्वीप्रमाणे लागू करावी. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर नाही तर हिंगोलीतील आंदोलनाचा वणवा राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरेल. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढाई सुरू राहील. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र आले पाहिजे..या वेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.